For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा 15 सदस्यांचा हॉकी संघ जाहीर

06:40 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा 15 सदस्यांचा हॉकी संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

चंदीगडमध्ये 7 ते 18 जुलै दरम्यान आयोजित केलेल्या हॉकी इंडियाच्या उपकनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ओमान मस्कत येथे 20 ते 25 जुलै दरम्यान होणाऱ्या पहिल्या युवा हॉकी 5एस आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता हे सरावाचे शिबिर राहणार आहे.

सदर शिबिर पंजाब विद्यापीठाच्या संकुलात घेतले जाणार आहे. या शिबिरात भारतीय उपकनिष्ठ हॉकीपटूंना भारताचा माजी कर्णधार सरदार सिंगचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

भारतीय हॉकी संघ-करण गौतम, अरमान सोरेंग, सावन कुमार, अनिस बहुत्रा, अर्शदीप सिंग, केतन कुशावह, शाहरुख अली, राहुल यादव, रोमीत पाल, आशिष तानी पूर्ती, आकाशदीप अवी माणिकपुरी, सिद्धार्थ बेल, प्रल्हाद राजबर आणि आयुष रजक.

Advertisement
Tags :

.