महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीयांचा सोन्याकडे वाढला ओढा

06:58 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिमाहीत 210 टन सोन्याची खरेदी : वर्ल्ड गोल्ड कौन्सीलची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये भारतीयांनी मोठ्या प्रमाणात वाढ दर्शवली असल्याचे दिसून आले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल यांच्या  अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या तिमाहीत एकंदरीत 210 टन सोन्याची खरेदी भारतीयांनी केली आहे.

या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताने बार आणि नाण्यांच्या माध्यमातून 55 टन सोन्यामध्ये गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2015 नंतर पाहता तिसऱ्या तिमाहीतील सोन्यामधली गुंतवणूक सर्वाधिक मानली जात आहे. आगामी उत्सवी काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मागणी कमी होणार असल्याचे चिन्ह दिसते आहे. सोन्याच्या किमतीत वाढ अशीच होत राहिली तर खरेदीमध्ये तीन वर्षाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक घट होताना दिसणार आहे, असेही वर्ल्ड गोल्ड कौन्सीलने म्हटले आहे.

 आगामी काळात किमती वाढणार

वर्षाच्याअखेर लग्नाचा हंगाम असून त्याचप्रमाणे दिवाळी उत्सवादरम्यान भारतात सोन्याची मागणी सामान्यत: वाढलेलीच पाहायला मिळते. या उत्सवी काळामध्ये सोने खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. सोन्याचे बार आणि नाण्यांची मागणी वर्षाच्या आधारावर पाहता 20 टक्के इतकी वाढली आहे. गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये 38 टक्के अधिक मागणी सोन्यामध्ये राहिली आहे. जी सरासरी 40 टन इतकी दिसून आली आहे.

 सोने खरेदी आधीच पूर्ण

दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या किमती घटल्याने अधिक प्रमाणात सोने खरेदी केली होती. लग्न आणि उत्सवी काळामध्ये सोन्याच्या किमती वाढणार असल्याचे गृहित धरुन भारतीयांनी आवश्यक सोन्याची खरेदी आधीच करुन ठेवली आहे. जुलै आणि सप्टेंबर 2023 च्या कालावधीमध्ये जागतिक पातळीवर सोन्याची मागणी पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत 8 टक्के अधिक होती. मागच्या वर्षी समान अवधीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर 6 टक्के सोन्याची मागणी तशीच कमीच राहिली आहे जी 1147  टन इतकी होती.

किमती घसरल्याने खरेदीत वाढ

तिसऱ्या तिमाहीमध्ये भारतीयांनी जवळपास 10 टक्के वाढीसह 210 टन इतके सोने खरेदी केले आहे. किमती कमी झाल्याने खरेदीदारांनी सोने घेण्यावर अधिक भर दिला होता. 2023 मध्ये आतापर्यंत पाहता एकंदर सोने खरेदीचे प्रमाण पाहता मागच्या वर्षाच्या समानअवधीच्या तुलनेत कमी आहे. कारण या अवधीमध्ये सोन्याच्या किमती वाढल्याने खरेदीदार यापासून दूर राहिले होते. पहिल्या तिमाहीमध्ये सोन्याच्या खरेदीमध्ये काहीशी नरमाई होती मात्र दुसऱ्या तिमाहीत पुन्हा सोने खरेदीत भारतीयांचा उत्साह दिसून आला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article