For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईल डेटा वापरात भारतीय जगात भारी

03:10 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल डेटा वापरात भारतीय जगात भारी
Advertisement

सरासरी 31 जीबी डेटाचा  वापर : नोकिया मोबाईल  :  ब्रॉडबँड इंडेक्स 2026 च्या अहवालामधून माहिती समोर

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वर्ष 2025 मध्ये भारतामध्ये मोबाईल डेटाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याची माहिती आहे. दरम्यान यामध्ये प्रत्येक वापरकर्त्याचा सरासरी मासिक डेटा वापर 31 जीबीपेक्षा जास्त झाला आहे. 5 जी डेटा ट्रॅफिकमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे एकूण मोबाईल ब्रॉडबँड ट्रॅफिकच्या सुमारे 47 टक्के राहिल्याची माहिती सर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे.

Advertisement

डिजिटल जगात भारताची मोठी झेप

भारताने डिजिटल जगात मोठी झेप घेतली आहे. भारतातील मोबाईल डेटा वापराने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 2025 साली वापरकर्त्याचा सरासरी मासिक डेटा वापर 31 जीबीपेक्षा जास्त झाला आहे. ही वाढ 5 जी च्या विस्तारामुळे आणि एआय-आधारित सेवांच्या वाढत्या मागणीमुळे झाली आहे. नोकियाच्या ताज्या अहवालानुसार, देशात डेटाचा वापर वेगाने वाढत आहे. आगामी काही वर्षांत यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे, एकूण डेटा ट्रॅफिकपैकी जवळपास निम्मा डेटा आता 5 जी हाताळत असल्याची माहिती आहे.

भारतातीलडिजिटल वापराविषयी...

?     2025 मध्ये देशातील प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा वापर 31 जीबी पेक्षा जास्त झाला आहे.

?     5 जी ट्रॅफिकमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवली गेली

?     2025 मध्ये संपूर्ण भारतातील 5जी डेटा ट्रॅफिक 12.9 एक्झाबाइट्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे

?     एकूण मोबाईल ब्रॉडबँड ट्रॅफिकच्या सुमारे 47 टक्के असेल.

?     वाढीचे मुख्य कारण एआय अॅप्लिकेशन्स आणि 4के स्ट्रीमिंग आहे.

इंटरनेट वापरात 5जी नेटवर्कची मोठी भूमिका

केवळ मोबाईलच नाही, तर केबल्सशिवाय वेगवान इंटरनेट प्रदान करणाऱ्या ‘फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस“ तंत्रज्ञानाच्या बाबतीतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 5 जी डेटा वापरामध्ये एफडब्लूए (फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस इंडिया) चा वाटा 25 टक्क्यांहून अधिक झाला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या वापरकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये 5 जीचे वर्चस्व सर्वाधिक आहे.

डेटा वापर का वाढत आहे?

गेल्या पाच वर्षांत डेटा वापरामध्ये 18 टक्क्यांची चक्रवाढ वाढ नोंदवली गेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एआय अॅप्स, 4 के व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि क्लाउड गेमिंग यांसारखे जास्त डेटा वापरणारे प्लॅटफॉर्म होय. 2025 मध्ये, एकूण डेटा ट्रॅफिक दरमहा 27 एक्झाबाइट्सपेक्षा जास्त होईल. स्वस्त 5 जी  स्मार्टफोन्स आणि उत्तम नेटवर्क कव्हरेजने यात मोठी भूमिका बजावली आहे.

Advertisement
Tags :

.