For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडात भारतीयाच्या मारेकऱ्याला आजीवन कारावास

06:52 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅनडात भारतीयाच्या मारेकऱ्याला आजीवन कारावास
Advertisement

कार्तिकच्या परिवाराला मिळाला न्याय

Advertisement

वृत्तसंस्था/ टोरंटो

कॅनडाच्या टोरंटो येथील न्यायालयाने भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेवच्या हत्येप्रकरणी दोषी इसमाला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर गुन्हेगाराने मानसिक आजाराच्या आधारावर शिक्षेतून मुक्त करण्याची मागणी केली होती. टोरंटोच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जेन केली यांनी गुन्हेगार रिचर्ड एडविनला दोन वेगवेगळ्या हत्यांप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. या हत्या 7 एप्रिल आणि 9 एप्रिल 2022 रोजी झाल्या होत्या. तर रिचर्डने 21 वर्षीय कार्तिक वासुदेवच्या हत्येची बाब मान्य केली होती.

Advertisement

गुन्ह्यावेळी रिचर्ड हा मानसिक आजार सिझोफ्रेनियाने पीडित होता आणि योग्य-अयोग्यात फरक करण्याच्या स्थितीत नव्हता, याचमुळे त्याला गुन्ह्यासाठी जबाबदार मानले जाऊ नये असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला होता. रिचर्ड मानसिक आजाराने ग्रस्त होता, परंतु तो स्वत:च्या कृत्याचे स्वरुप समजण्यास असमर्थ नव्हता असे न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.