कमी वयात वृद्ध होतेय भारतीयांचे हृदय
भारतात वाढत्या स्थुलत्वामुळे अनेक लोकांचे कार्डियक एज म्हणजेच त्यांच्या हृदयाचे वय त्यांच्या वास्तविक वयापेक्षा अधिक लवकर वाढत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांनुसार हृदय अन् रक्तवाहिन्या वेगाने वृद्ध होणे असा याचा अर्थ आहे, यामुळे कमी वयातच हृदयविकार, स्ट्रोक आणि हृदयाशी निगडित अन्य समस्यांचा धोका वाढत आहे.
तज्ञांचा हा इशारा एनएफएचएस-6 च्या निष्कर्षांनंतर समोर आला आहे. यात भारतीय प्रौढांमध्ये स्थुलत्व अधिक वेगाने वाढल्याचे दिसून आले. 2023-24 मध्ये 15-49 वयोगटातील 30.7 टक्के महिला स्थुलत्वाने ग्रस्त होत्या. तर 2019-21 च्या एनएफएचएस-5 मध्ये हा आकडा 24 टक्के होता. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 22.9 टक्क्यांवरून वाढत 27.3 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. वाढता मधूमेह आणि उच्च रक्तदाबासोबत ही प्रवृत्ती हृदयविकाराच्या रुग्णांचा भार आणखी वाढविणार असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
जीवनशैलीत सुधार आवश्यक
कार्डियक एज व्यक्तीचे वास्तविक वय नव्हेतर त्याच्या हृदय-तंत्राच्या आरोग्याला दर्शविते. स्थुलत्व, मधूमेह, रच्च रक्तदाब आणि निष्क्रीय जीवनशैली असलेला 35 वर्षीय इसम देखील कुठल्याही अधिक वय असलेल्या व्यक्तीइतकीच हृदय जोखिम झेलू शकतो. हृदय आणि रक्तवाहिन्यांना नुकसान अनेकदा लक्षणे दिसण्यापूर्वीच सुरू होते याची जाणी अनेक भारतीयांना नाही. अशास्थितीत जीवनशैलीत सुधार आणि सक्रीय दिनक्रम अत्यंत आवश्यक आहे.
वेळीच उपचार
नियमित व्यायाम, संतुलित आहार, अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ आणि शर्करायुक्त पेयांपासून अंतर, 7-8 तासांची झोप, वजन नियंत्रण, धूम्रपान सोडणे आणि वेळीच उपचार अवलंबून हृदयाला तरुण ठेवले जाऊ शकते. पोटाच्या आसपासची अतिरिक्त चरबी सूज, खराब कोलेस्ट्रॉल, मधूमेह आणि उच्च रक्तदाब वाढविते, ज्यामुळे हृदयविकाराचा धक्का, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोकचा धोका वाढत असतो.