महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीयांचे लक्ष नीरज चोप्रावर

06:50 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुपारी होणार पात्रता फेरी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारताच्या अॅथलेटिक्समधील आशा आता भालाफेकपटू नीरज चोप्रावर लागल्या असून आज मंगळवारी दुपारी भालाफेक क्रीडा प्रकार सुरू होणार आहे. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यास तो सज्ज झाला आहे.

या मोसमात त्याने दुखापतीवर मात करून सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. आज दुपारी तो पात्रता फेरीत खेळणार असून 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा आहे. त्याने सुवर्ण जिंकल्यास सलग दोनदा जेतेपद मिळविणारा पाचवा खेळाडू ठरेल आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण जिंकणारा तो भारताचा पहिला ऑलिम्पियन होईल. यापूर्वी एरिक लेमिंग (स्वीडन, 1908 व 1912), जॉनी मायरा (फिनलंड, 1920 व 1924), चोप्राचा आदर्श जॅन झेलेझ्नी (झेक प्रजासत्ताक, 1992, 1996, 2000) व आंद्रेयास थॉरकिल्डसेन (नॉर्वे, 2004 व 2008) या चौघांनाच भालाफेकमध्ये सलग सुवर्णपदक जिंकता आले होते.

नीरजने यावर्षी फक्त तीन स्पर्धांतच भाग घेतला असला तरी तो पूर्ण बहरात आहे. या स्पर्धांत त्याच्या एकाही प्रतिस्पर्ध्यांला विशेष चमक दाखवता आलेली नाही. मेमध्ये झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मी. फेक केल्यानंतर दक्षता म्हणून 28 मे रोजी ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाईकमधून त्याने माघार घेतली. 18 जून रोजी फिनलँडमधील पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकावल्यानंतर 7 जुलैच्या पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article