For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भारतीयां’नी मोडला झुकरबर्गचा विक्रम

06:52 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘भारतीयां’नी मोडला झुकरबर्गचा विक्रम
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

Advertisement

भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन तरुण नागरीकांनी विश्वविख्यात उद्योगपती मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला आहे. झुकरबर्ग त्यांच्या वयाच्या 23 व्या वर्षी अब्जाधीश झाले होते. या भारतीय वंशाच्या तरुणांनी वयाच्या 22 व्या वर्षीच अब्जाधीश होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्यासह एका मूळच्या अमेरिकन नागरीकानेही अब्जाधीश होण्याचा विक्रम केला आहे, अशी माहिती आहे.

आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा अशी या भारतीय वंशाच्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही अमेरिकेचे नागरीक आहेत. त्यांनी महाविद्यालकीन शिक्षण सोडून एका स्टार्टअप कंपनीचा प्रारंभ केला आहे. आज या कंपनीचे समभागमूल्य 1 हजार कोटी डॉलर्सपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे हे दोन्ही तरुण त्यांच्या 22 व्या वर्षीच अब्जाधीश झाले आहेत. त्यांच्या कंपनीचा ब्रँडन फ्रूडी हा मूळचा अमेरिकन भागीदारही त्यांच्यासह त्याच्या तरुण वयातच अब्जाधीश झाला आहे.

Advertisement

कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाची कंपनी

या तरुण मित्रांनी ‘मेर्कॉर’ नामक स्टर्टअप कंपनीचा प्रारंभ केला. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून कंपनीचा प्रारंभ करण्याचे धाडस दाखविल्याने त्यांना अमेरिकेच्या एका प्रसिद्ध न्यासाच्या माध्यमातून 1 लाख डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. या दोन्ही तरुणांनी आपली कंपनी अल्पावधीतच नावारुपाला आणली. त्यानंतर त्यांना 35 कोटी डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. आज ही कंपनी 1 हजार कोटी डॉलर्स सममागमूल्याची कंपनी झाली आहे. या कंपनीच्या समभागांमध्ये या दोन तरुणांचे आणि त्यांच्या अमेरिकन भागीदाराचे प्रत्येकी 22 टक्के समभाग आहेत. त्यामुळे हे तिन्ही भागीदार आता 100 कोटी डॉलर्सहून अधिक मालमत्तेचे धनी झाले आहेत. वयाच्या केवळ 22 व्या वर्षी ही कामगिरी त्यांनी करुन दाखविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांची कंपनी कॅलिफोर्निया प्रांतातील सॅन जोसे येथे आहे. हिरेमठ हे हार्वर्ड विद्यापीठाच्या संगणक विभागात शिक्षण घेत होते. त्यांनी या विद्यापीठात साहाय्यक संशोधक म्हणूनही काम केले होते. तथापि, शिक्षण सोडून त्यांनी स्टार्टअप कंपनीचा प्रारंभ केला आणि ती अल्पावधीन प्रसिद्ध कंपनी बनविली. अशा प्रकारे या तीन्ही युवकांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मागे टाकला. इतकेच नव्हे, तर कमी वयात अब्जाधीश होण्याचे आतापर्यंतचे सर्व विक्रम त्यांनी मागे सोडले असून आपला नवा ठसा उद्योगविश्वावर उमटविला आहे.

Advertisement
Tags :

.