कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांची विजयी सलामी

06:58 AM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीलंकन संघावर 59 धावांनी मात : सामनावीर दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने विजयी सुरुवात केली. मंगळवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकन महिला संघाचा डी-एल नियमानुसार 59 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 269 धावा केल्या. यानंतर 271 धावांच्या सुधारित विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना लंकन संघ 211 धावांत ऑलआऊट झाला. फलंदाजीसह गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, भारतीय महिलांचा पुढील सामना दि. 5 रोजी पाकिस्तानविरुद्ध कोलंबो येथे होईल.

गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकन महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मानधना 8 धावा काढून बाद झाली. यानंतर प्रतीका आणि हरलीन देओल या जोडीने अर्धशतकी भागीदारी साकारली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच श्रीलंकेने भारताला 81 रन्सवर दुसरा झटका दिला. प्रतीका 37 धावा करुन माघार परतली. हरलिनला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना रणवीराने बाद केले. तिने 6 चौकारासह 48 धावा केल्या.

दीप्ती, अमनज्योतची अर्धशतके

प्रतीका, हरिलन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेली जेमिमा रॉड्रिग्ज भोपळाही फोडू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरला 21 धावा करता आल्या. रिचा घोषने 2 धावांवर आपली विकेट फेकली. यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर या दोघींनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दरम्यान अमनज्योत आणि दीप्तीने फटकेबाजी केली. अमनज्योतने 56 चेंडूत 57 धावा केल्या. अमनज्योतनंतर दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा या जोडीने आठव्या विकेटसाठी 23 बॉलमध्ये 42 रन्स जोडल्या. स्नेह राणाने 28 धावांचे योगदान दिले. तर दीप्ती शर्मा हिने 53 धावांची शानदार खेळी साकारली. यामुळे टीम इंडियाने 47 षटकांत 8 गडी गमावत 269 धावा केल्या.

श्रीलंकन संघ पराभूत

भारताने 269 धावा जमविल्या असल्या तरी लंकेला डकवर्थ-लुईस नियमानुसार 271 धावांचे विजयाचे उद्दिष्ट मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना लंकन संघ 45.4 षटकांत 211 धावांत ऑलआऊट झाला. कर्णधार चमारी अटापटूने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. निलाक्षिका सिल्वाने 35 तर हर्षिता समरविक्रमाने 29 धावांचे योगदान दिले. इतर महिला फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद होत गेल्याने श्रीलंकन महिला संघाला 59 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर दीप्ती शर्माने गोलंदाजीतही कमाल करताना 54 धावांत 3 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला संघ 47 षटकांत 8 बाद 269 (प्रतीका रावल 37, स्मृती मानधना 8, हरलिन देओल 48, हरमनप्रीत कौर 21, दीप्ती शर्मा 53, अमनज्योत कौर 57, स्नेह राणा नाबाद 28, रणवीरा 4 बळी, प्रबोधनी 2 बळी)

श्रीलंकन महिला संघ (डी-एल नियमानुसार सुधारित उद्दिष्ट 271) 45.4 षटकांत सर्वबाद 211 (चमारी अटापटू 43, हर्षिता समरविक्रमा 29, निलाक्षिका 35, दीप्ती शर्मा 54 धावांत 3 बळी, स्नेह राणा आणि श्रीचरणी प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article