For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला संघ निवड शनिवारी

06:22 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला संघ निवड शनिवारी
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

इंग्लंड आणि वेल्स यांच्या संयुक्त यजमानपदाने 12 जूनपासून सुरू होणाऱ्या 2026 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची निवड शनिवारी 2 मे रोजी केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश राहील. या स्पर्धेतील न्यूझीलंड हा विद्यमान विजेता आहे. 2024 साली न्यूझीलंड महिला संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 12 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामना 5 जुलै रोजी खेळविला जाईल. महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय महिला संघाकरिता सरावाच्या दृष्टिकोनातून इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघातील पहिला टी-20 सामना 28 मे रोजी, दुसरा सामना 30 मे आणि तिसरा सामना 2 जून रोजी खेळविला जाईल. हरपनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली नुकत्याच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला 1-4 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.