महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

06:44 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. रविवारी झालेल्या अ गटातील लढतीत भारताने सिंगापूरचा 4-1 अशा फरकाने दणदणीत पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. त्याचप्रमाणे पुरुषांच्या विभागात भारतीय संघाने थायलंडचा क गटातील पहिल्या लढतीत 3-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली.

Advertisement

भारत आणि सिंगापूर यांच्यात उबेर चषकासाठीच्या अ गटातील लढतीत पहिल्या एकेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या मीनने भारताच्या अस्मिता छलियाचा 21-15, 21-18 असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात के. प्रिया आणि श्रृती मिश्रा या भारतीय जोडीने सिंगापूरच्या हेंग आणि जिन यांचा 21-15, 21-16 अशा गेम्समध्ये फडशा पाडत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. अन्य एका एकेरीच्या सामन्यात भारताच्या इशरानी बारुआने सिंगापूरच्या इनसेरा खानचा 21-13, 21-16 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सिमरन सिंघी आणि रितिका ठक्कर यांनी सिंगापूरच्या इलिसा आणि झेन यांचा 21-8, 21-11 असा पराभव करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या एकेरी सामन्यात अनमोल खराबने सिंगापूरच्या मेगानचा 21-15, 21-13 असा पराभव करत सिंगापूरचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले.

पुरूषांच्या विभागात थॉमस चषकासाठीच्या क गटातील सामन्यात भारताने थायलंडचा 3-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. सलामीच्या एकेरी सामन्यात थायलंडच्या विश्वविजेत्या व्हिटीडेसमने भारताच्या एच. एस. प्रणॉयला 22-20, 21-14, असा पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर दुहेरीच्या समान्यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी थायलंडच्या पी. सुकुपहून आणि टी. पेकापोन यांचा 21-19, 19-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतरच्या एकेरी सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने थायलंडच्या पी. तिरेरासकूल याचा 21-12, 19-21, 21-16 असा पराभव करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या पुरूष दुहेरीच्या लढतीत थायलंडच्या पी. तेनाडोन व सोटॉन यांचा 21-19, 21-15 असा पराभव करत थायलंडचे या लढतीतील आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. आता भारतीय संघाचा क गटातील पुढील फेरीतील लढत इंग्लंडशी होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article