भारतीय महिला संघ पाचव्या स्थानी
06:47 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, ऑन्टेरिओ
Advertisement
येथे नुकत्याच झालेल्या कनिष्ठांच्या विश्व सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिला संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठीच्या प्लेऑफ लढतीमध्ये भारताने इंग्लंडचा 2-0 असा पराभव केला. या लढतीमध्ये पहिल्या सामन्यात भारताच्या रुद्र सिंगने इंग्लंडच्या रेखा केमेकसेईचा 11-5, 8-11, 11-5, 11-6 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या सानवी कलंकीने ब्रिटनच्या इव्हे पर्किन्सचा 11-6, 11-9, 11-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत पाचवे स्थान मिळविले. तत्पूर्वी झालेल्या एका लढतीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून प्ले ऑफ गटात स्थान मिळविले होते.
Advertisement
Advertisement