For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला टेटे संघ उपांत्यपूर्व फेरीत

06:48 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला टेटे संघ उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, टोयोटा

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात भारताच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना मंगळवारी थायलंडचा पराभव केला. मात्र भारतीय पुरुष संघाचे आव्हान संपुष्टात आले. दक्षिण कोरियाने भारताचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

भारत आणि थायलंड महिला संघातील झालेल्या लढतीमध्ये भारताने थायलंडचा 3-2 अशा फरकाने निसटता पराभव करत शेवटच्या 8 संघात प्रवेश केला. भारतीय संघातील श्रीजा अकुलाने पहिल्या एकेरी सामन्यात थायलंडच्या परानंगचा 3-2 असा पराभव केला. अकुलाने हा सामना 11-7, 11-1, 9-11, 6-11, 12-10 असा जिंकला. या लढतीतील दुसरा सामनाही पाच गेम्सपर्यंत लांबला. भारताच्या यशस्वीनी घोरपडेने थायलंडच्या सुथासिनीचा 3-2 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात भारताच्या दिया चितळेला पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या जिनिपाने चितळेचा 3-2 असा पराभव करुन भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. चौथ्या सामन्यात यशस्वीनी घोरपडेने थायलंडच्या परानंगचा 11-5, 11-8, 11-9 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या सामन्यात थायलंडच्या सुथासिनीने भारतीय खेळाडूवर मात केली पण भारताने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

पुरुषांच्या विभागात दक्षिण कोरियाने भारताचा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताच्या हरमीत देसाईला पहिल्या सामन्यात कोरियाच्या जिनने 3-1 अशा फरकाने पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात कोरियाच्या जंगसंगने भारताच्या मनुष शहावर 3-2 अशा फरकाने मात करत कोरियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या अॅन यूनने मानव ठक्करचा 3-1 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताचे आव्हान 3-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :

.