For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

06:22 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

2026 ची सॅफ महिलांची फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 25 मे ते 6 जून दरम्यान गोव्यातील मडगाव येथे खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारताच्या फुटबॉल संघाची घोषणा राष्ट्रीय प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्रीने केली आहे. या स्पर्धेसाठी 23 सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे.

गेल्या मंगळवारी या स्पर्धेसाठी 26 सदस्यांचा प्राथमिक संघ जाहीर करण्यात आला होता. या प्राथमिक संघातून शुभांगी सिंग, प्रियदर्शनी सेलादुराई आणि रिंपा हलदार यांना वगळण्यात आले आहे. सॅफ महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. भारताचा सलामीचा सामना मालदीव बरोबर 25 मे रोजी सायंकाळी 7 वाजता खेळविला जाईल. तर भारताचा दुसरा सामना बांगलादेश बरोबर 31 मे रोजी होणार आहे. अ गटामध्ये नेपाळ, श्रीलंका आणि भूतान यांचा समावेश आहे. या दोन गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 3 जून रोजी तर अंतिम सामना 6 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता मडगाव येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळविला जाईल.

Advertisement

भारतीय फुटबॉल संघ : गोलरक्षक - पंथोई चानू इलेंगबाम, रिबांशी जामू, श्रेया हुडा. बचावफळी - अॅस्टेम ओरॉन, ज्युली किशन, निर्मलादेवी पी., पूर्णिमा कुमारी, रंजना चानू एस., सरीता युमनाम, टी. चानू तोइजम. मध्यफळी - आवेका सिंग, जसोदा मुंडा, प्रियांगकादेवी नेरोम, सनफिदा नॉनग्रुम, संगीता बसफोर, शिल्कीदेवी हेमाम. आघाडी फळी - ग्रेस डांगमेई, करिष्मा शिरवईकर, लिंडा कॉम सेर्टो, मालविका पी., मनिषा कल्याण, प्यारी झाझा, सौम्या गुगुलोथ.

Advertisement
Tags :

.