For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा सिंगापूरवर दणदणीत विजय, उपांत्य फेरीत कोरियाशी गाठ

06:22 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा सिंगापूरवर दणदणीत विजय  उपांत्य फेरीत कोरियाशी गाठ
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘गट ब’मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने सिंगापूरचा 7-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरी गाठली. आता त्यांचा सामना कोरियाशी होईल. सुनीलिता टोप्पो हिने या सामन्यात दोन गोल केले.

Advertisement

भारताने ’‘गट ब’मधील सर्वच्या सर्व पाच सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. उपांत्य फेरीचा सामना 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतासाठी कर्णधार सलिमा टेटे (17 व्या मिनिटाला), सुनीलिता (22 व्या व 24 व्या मिनिटाला), लालरेम्सियामी (26 व्या मिनिटाला), ऋतुजा दादोसो पिसाळ (29 व्या मिनिटाला), निक्की प्रधान (35 व्या मिनिटाला) आणि दीपिका (55 व्या मिनिटाला) यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेता आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीनचा सामना यजमान जपानशी होईल.

सलिमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व राखले असले तरी, पहिल्या सत्रात सिंगापूरने भारताला चांगलीच झुंज दिली. सिंगापूरचा ‘पेनल्टी कॉर्नर’वरील बचाव विशेष उल्लेखनीय होता. त्यांनी भारताला मिळालेले तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर रोखून धरले. खेळाचा बराचसा भाग सिंगापूरच्या बाजूच्या मैदानावर खेळला गेला. भारताने एकापाठोपाठ एक आक्रमणे केली आणि अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु सिंगापूरच्या खेळाडूंनी जिद्दीने बचाव करत भारताला गोल करण्यापासून रोखले.

Advertisement

मात्र, दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीलाच म्हणजेच दुसऱ्या मिनिटाला कर्णधार सलिमा हिने उत्कृष्ट ’फील्ड गोल’ करत भारताला आघाडी मिळवून दिली. 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरील एका अयशस्वी प्रयत्नानंतर मिळालेल्या संधीचे सुनीलिताने गोलमध्ये रूपांतर केले आणि भारताची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर सुनीलिताने पुन्हा एकदा गोल केला. पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाने मारलेला ‘फ्लिक’ तिने अचूकपणे गोलमध्ये वळवला. त्यानंतर तीन मिनिटांनी लालरेम्सियामीने पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाचा आणखी एक ‘फ्लिक’ गोलमध्ये वळवून भारताची आघाडी अधिक वाढवली. 30 व्या मिनिटाला ऋतुजाने एका उत्कृष्ट ‘फील्ड गोल’द्वारे गोलसंगया 5-0 अशी केली.

पण पेनल्टी कॉर्नर्सच्या बाबतीत भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी सुमार राहिली. पहिल्या दोन सत्रांमध्ये मिळालेल्या 15 पैकी केवळ तीनच कॉर्नर्सचे त्या गोलमध्ये रूपांतर करू शकल्या. भारतीयांना मोठ्या संख्येने पेनल्टी कॉर्नर्स मिळत राहिले, परंतु थेट प्रयत्नांतून गोल करण्यात त्या अपयशी ठरल्या.

Advertisement
Tags :

.