For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिना दौरा

06:43 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिना दौरा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारताचा वरिष्ठ महिला हॉकी संघ अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात चार सामन्यांची हॉकी मालिका खेळविली जाणार आहे. सदर हॉकी मालिका अर्जेटिनातील ब्युनोस आयरीस येथे 13 ते 17 एप्रिल दरम्यान होणार आहे.

या दौऱ्यामध्ये भारत आणि अर्जेंटिना महिला हॉकी संघांत चार सामन्यांची हॉकी मालिका चुरशीची अपेक्षित आहे. ही मालिका ब्युनोस आयरीसमधील टर्फ मैदानावर खेळविली जाईल. या मालिकेतील सामने 13, 14, 16 आणि 17 एप्रिल रोजी होणार आहेत. या सामन्यांना भारतीय वेळेप्रमाणेनुसार सकाळी 11 वाजता प्रारंभ होईल. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये या दोन संघांत शेवटचा सामना 2024-25 च्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता. 2026 च्या उत्तराधार्थ आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे तसेच चालु वर्षा अखेरीस आशियाई क्रीडा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या दोन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी भारतीय महिला हॉकी संघाला सरावाची आणि विदेशातील वातावरणाची सवय व्हावी यासाठी हा दौरा हॉकी इंडियाने आयोजित केला आहे. या दौऱ्यासाठी 24 सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे. जागतिक हॉकी क्षेत्रामध्ये अर्जेंटिनाचा महिला हॉकी संघ हा जगातील एक सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. या संघावर विजय मिळविण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाला अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.