For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला फुटबॉल संघ विजय

06:32 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला फुटबॉल संघ विजय
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

तुर्कीच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला वरिष्ठ फुटबॉल संघाने अॅन्टेलियात झालेल्या मित्रत्त्वाच्या फुटबॉल सामन्यात भारताने हेर्था बीएससी फ्रान या जर्मन क्लब संघाला 1-0 अशा गोल फरकाने पराभूत केले. या सामन्यातील एकमेव गोल भारतीय संघातील ग्रेस दांगमेईने नोंदविला.

हा सामना सुरू झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. 37 व्या मिनिटाला ग्रेस दांगमेईने हेर्था बीएससी फ्रान संघाच्या बचाव फळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 2026 मध्ये होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाकरिता हा सरावाचा दौरा आयोजित केला आहे. सदर स्पर्धा ऑस्ट्रेलियात भरविली जात आहे. सदर स्पर्धा 4 मार्चपासून सुरू होईल. भारतीय महिला फुटबॉल संघाचा सलामीचा सामना व्हिएतनामबरोबर 4 मार्चला होईल. सध्या तुर्कीच्या दौऱ्यावर भारतीय महिला फुटबॉल संघ आणखीन दोन मित्रत्वाचे सामने खेळणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.