गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा भारतीय महिला फेडरेशनकडून निषेध
10:53 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भारतीय महिला फेडरेशनने निषेध केला आहे. अमित शहा यांचे वक्तव्य निषेधार्थ असून त्यांनी संविधानचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. याबद्दल अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. फेडरेशनचे सल्लागार अॅड. नागेश सातेरी, अध्यक्षा कला सातेरी, मिरा मादार, जुलेखा, हसिना, शेखव्वा, यल्लव्वा यांच्यासह अन्य सदस्यांनी हे निवेदन दिले आहे.
Advertisement
Advertisement