भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी
लंकेचा 9 गड्यांनी पराभव, प्रतिका रावल सामनावीर
वृत्तसंस्था / कोलंबो
महिलांच्या तिरंगी वनडे मालिकेतील येथे रविवारी पावसाच्या अडथळ्यामध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा 56 चेंडू बाकी ठेवून 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकविणाऱ्या प्रतिका रावलला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना प्रत्येकी 39 षटकांचा खेळविला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 38.1 षटकात 147 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 29.4 षटकात 1 बाद 149 धावा जमवित हा सामना आरामात जिंकला. या स्पर्धेत द. आफ्रिका हा तिसरा संघ आहे.
लंकेच्या डावामध्ये सलामीच्या हसिनी परेराने 46 चेंडूत 4 चौकारांसह 30 तर समर विक्रमाने 1 चौकारांसह 14, कविशा दिलहारीने 26 चेंडूत 3 चौकारांसह 25, निलाक्षिका सिल्वाने 10 तर संजीवनीने 39 चेंडूत 3 चौकारांसह 22 आणि कुलसुर्याने 1 चौकारांसह 17 धावा जमविल्या. लंकेच्या डावामध्ये 13 चौकार नोंदविले गेले. पहिल्या पावरप्ले दरम्यान लंकेने 37 धावा जमविताना 1 गडी गमविला. भारतातर्फे स्नेह राणाने 31 धावांत 3, दिप्ती शर्माने 22 धावांत 2, श्री चरणीने 26 धावांत 2 तर अरुंधती रे•ाrने 26 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये प्रतिक रावल आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने 59 चेंडूत 54 धावांची पहिल्या गड्यासाठी भागादरी केली. रणवीराने स्वत:च्याच गोलंदाजीवर मानधनाला टिपले. तिने 46 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावा जमविल्या. प्रतिक रावल आणि हर्लिन देवोल यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 95 धावांची भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रावलने 62 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 50 तर देवोलने 71 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 48 धावा केल्या. भारताच्या डावामध्ये 17 चौकार नोंदविले गेले. भारताने पहिल्या 10 षटकात 54 धावा जमविताना 1 गडी बाद केला. रावलने 62 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक: लंका 38.1 षटकात सर्वबाद 147 (हसिनी परेरा 30, समर विक्रमा 14, दिलहारी 21, एन. सिल्वा 10, संजीवनी 22 , कुलसुर्या 17, अवांतर 14, स्नेह राणा 3-31, दिप्ती शर्मा 2-22, श्री चरणी 2-26, रे•ाr 1-26), भारत 29.4 षटकात 1 बाद 149 (प्रतिका रावल नाबाद 50, स्मृती मानधना 43, हार्लिन देवोल नाबाद 48, रणवीरा 1-32)