महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांचा जॉर्जियावर विजय

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डी. गुकेशच्या कामगिरीच्या जोरावर पुरुष संघाची चीनवर मात

Advertisement

वृत्तसंस्था/बुडापेस्ट

Advertisement

ग्रँडमास्टर आर. वैशाली आणि वंतिका अग्रवाल यांनी अनुक्रमे लेला जावाखिशविली आणि बेला खोटेनाश्विली यांना पराभूत करताना केलेल्या शानदार प्रयत्नांच्या जोरावर भारतीय महिला संघाने येथे चालू असलेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जॉर्जियावर 3-1 असा दणदणीत विजय मिळवला आणि आपली अपराजित घोडदौड कायम ठेवली. भारतीय महिलांच्या आता सातही फेऱ्या झाल्या आहेत.

या दिवशी डी. हरिका व नाना डझाग्निझे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली, तर दिव्या देशमुखला एका चांगल्या स्थितीनंतर बरोबरीत लढत सोडविण्यास निनो बत्सियाश्विलीने भाग पाडले. अशा परिस्थितीत वंतिकाने तिच्यावरील वेळेचे दडपण अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळले आणि फक्त एक मिनिट राहिलेले असताना जवळपास 20 चाली रचत सामना जिंकला. महिला संघाला सलग सातवा विजय मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट तांत्रिक विजयाची नोंद करण्याची जबाबदारी शेवटी वैशालीवर येऊन पडली होती. ती तिने प्रभावीपणे पेलली. भारतीय महिलांनी संभाव्य 14 पैकी 14 गुण मिळवले असून युक्रेनवर विजय नोंदवणारा जवळचा प्रतिस्पर्धी पोलंडपेक्षा त्या पुढे आहेत.

दुसरीकडे, जवळपास सहा तास आणि 80 चाली इतक्या चाललेल्या लढतीत गुकेशने वेई यी याला पराभूत केल्यानंतर सातव्या फेरीत भारतीय पुरुष संघाने 2.5-1.5 अशा फरकाने चीनचा पराभव केला. गुकेशच्या विजयाने खुल्या विभागात चीनवरील भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य भारतीय खेळाडूंना काही प्रमाणात चांगली लढत दिल्यानंतर बरोबरीवर समाधान मानावे लागले. आर. प्रज्ञानंदने चीनच्या यांगी यूविऊद्धचा सामना झटपट बरोबरीत सोडविला, तर पी. हरिकृष्णाने काही काळ दबाव टाकला खरा, पण त्यालाही बरोबरीवर समाधान मानावे लागले. अर्जुन एरिगेसी आणि बु झियांगझी यांच्यातील सामनाही अनिर्णीत राहिला.

गुकेश - लिरेन लढत टळली

जागतिक विजेतेपदासाठीच्या लढतीतील गुकेश आणि डिंग लिरेन हे दोन स्पर्धक सिंगापूरमधील त्यांच्या सामन्याच्या अगोदर ऑलिम्पियाडमधील भारत-चीन लढतीत एकमेकाना भिडतील, अशी अटकळ होती. पण चिनी थिंक टँकने विद्यमान जागतिक विजेत्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. खेळाच्या पंडितांसाठी हा धक्काच होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article