For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक लढतीसाठी सज्ज

06:14 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक लढतीसाठी सज्ज
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

टाउटन : आज मंगळवारी येथे यजमान इंग्लंडविऊद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज होत असताना भारतीय संघ आपल्या मधल्या फळीतील समस्या सोडवण्याचे उद्दिष्ट बाळगून असेल. यासाठी दीप्ती शर्मा आणि रिचा घोष या भरवशाच्या जोडीकडून संघाला अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने निर्णायक सामन्यातील विजय हा केवळ परदेशातील आणखी एक द्विपक्षीय मालिका विजय देऊन जाणार नाही, तर या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकापूर्वी तो एक मोठा आत्मविश्वास वाढवणारा घटक ठरेल. भारतासाठी ही मालिका म्हणजे आगामी मोठ्या स्पर्धेच्या (विश्वचषकाच्या) दृष्टीने इंग्लंडमधील परिस्थितीला साजेशी सर्वोत्तम संघरचना पडताळून पाहण्यासाठीची एक चांगली संधी आहे.

Advertisement

या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये, एक अर्धशतक आणि 30 च्या घरातील धावा, अशा खेळी करणाऱ्या यास्तिका भाटियाने आतापर्यंत सर्वोत्तम फलंदाज म्हणून छाप पाडली आहे. जेमिमा रॉड्रिग्सनेही एक अर्धशतक झळकावले आहे, तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजी शैलीदार असलेली स्मृती मानधना आणि फलंदाजी आक्रमक असलेली शफाली वर्मा या दोघींनीही डावाची चांगली सुऊवात केली. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये भारताने शेवटच्या पाच षटकांमध्ये आपली गता गमावली आणि फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेली रिचा या दोन्ही सामन्यांमध्ये आपली अपेक्षित चमक दाखवू शकली नाही.

पहिल्या सामन्यात भाटिया आणि रॉड्रिग्स यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताला 7 बाद 188 अशी भक्कम धावसंख्या उभारता आली. विशेष म्हणजे 16 ते 20 या षटकांदरम्यान केवळ 40 धावाच झाल्या असूनही भारताने ही धावसंख्या गाठली. दुसऱ्या सामन्यात 169 धावांचा पाठलाग करताना भारत 70 धावांवर 1 गडी बाद अशा सुस्थितीत होता. मात्र 16 ते 20 या षटकांदरम्यान परिस्थिती पूर्णपणे बिघडली आणि भारताचे 28 धावांत 5 गडी बाद होऊन स्थिती दयनीय झाली.

रिचाचा अपवाद वगळता संघात षटकार मारणाऱ्या फारशा फलंदाज नाहीत. कर्णधार हरमनप्रीत ही कदाचित हवेत फटके मारण्याच्या बाबतीत सर्वांत तरबेज असलेली खेळाडू आहे. त्यामुळे 20 वे षटके संपेपर्यंत फलंदाजी करण्याची जबाबदारी तिला स्वत:च्या खांद्यावर घ्यावी लागेल. तसेच तिला संघाची धावसंख्या 190-200 च्या जवळ नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. महिलांच्या क्रिकेटमध्ये दहापैकी आठ वेळा ही धावसंख्या विजयासाठी पुरेशी ठरलेली आहे.

इंग्लंडसाठीही फलंदाजी हा चिंतेचा विषय ठरला आहे. दोन्ही सामन्यांचा विचार करता एमी जोन्सने केलेल्या 67 धावा हेच एकमेव अर्धशतक आहे. इतर अनेक अनुभवी फलंदाजांनी डावाची चांगली सुऊवात केली असली, तरी त्यांना ती गती दीर्घकाळापर्यंत कायम राखता आली नाही.

संघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदनी शर्मा, अऊंधती रे•ाr, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

इंग्लंड : चार्ली डीन (कर्णधार), एम. आर्लोट, टॅमी ब्युमॉन्ट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, नॅट सायव्हर-ब्रंट, पेज स्कॉलफिल्ड, लिन्से स्मिथ, डॅनी व्याट-हॉज, इसी वाँग.

सामन्याची वेळ : रात्री 11 वा.

Advertisement
Tags :

.