भारतीय महिलांचा सामना आज पाकिस्तानशी
वृत्तसंस्था/दुबई
महिला टी-20 विश्वचषकाच्या ‘अ’ गटातील महत्त्वाच्या दुसऱ्या सामन्यात आज रविवारी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार असून भारताला त्वरित संघटित व्हावे लागेल आणि असंतुलन दूर करावे लागेल. शुक्रवारी न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची भारताची संधी कमी झालेली नसली, तरी त्यामुळे संघ निश्चितच अडचणीत आला आहे. भारताचा धावसरासरी सध्या उणे 2.99 अशी खराब आहे आणि त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्यांना मोठा विजय मिळविणे अनिवार्य आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाकडून विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात किवींविऊद्ध खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये खराब कामगिरी झाली होती. भारताला आता लगेच कायापालट घडवावा लागेल. हे सोपे नाही, कारण गुऊवारी पहिल्या सामन्यात मजबूत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास उंचावला आहे.
पहिली पायरी म्हणून भारताला पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी त्यांची संघरचना जाग्यावर घालावी लागेल. अऊंधती रे•ाrच्या रुपाने एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला सामावून घेण्यासाठी त्यांनी न्यूझीलंडविऊद्ध फलंदाज कमी खेळविले. यामुळे हरमनप्रीतला तिसऱ्या क्रमांकावर, जेमिमा रॉड्रिग्सला चौथ्या क्रमांकावर आणि रिचा घोषला पाचव्या क्रमांकावर बढती देणे भाग पाडले. आणखी एक पराभव भारताला परवडणारा नाही. कारण तो ‘अ’ गटातून शेवटच्या चार संघांच्या टप्प्यात जाण्याच्या संधींना गंभीरपणे बाधा आणेल. टी-20 मध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धचे 15 पैकी 12 सामने जिंकलेले असले, तरी पाककडे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला चकीत करण्याची क्षमता आहे. त्यांची गोलंदाजी विशेषत: अनुभवी निदा दार, कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांच्यावर अवलंबून आहे.
संघ: भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, अऊंधती रे•ाr, रेणुकासिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन. राखीव : उमा चेत्री, तनुजा कंवर, सायमा ठाकूर.
पाकिस्तान: फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया ऊबाब, तुबा हसन.