For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला जपानकडून पराभूत

06:12 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला जपानकडून पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, सुझो (चीन)

Advertisement

येथे झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक 2026 च्या गट ब सामन्यात भारताच्या यू-17 महिला राष्ट्रीय संघ्ााला जपानकडून 0-3 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.

पूर्वार्धात गोलफलक कोरा राहिल्यानंतर जपानने 60 व्या मिनिटाला युमी हायाशीच्या 59 व्या मिनिटाच्या गोलमुळे आघाडी घेतली आणि युझुहा इकेडाने 76 आणि 81 व्या मिनिटाला असे दोन गोल केल्यामुळे चारवेळच्या चॅम्पियन जपानने गटातील आपला दुसरा विजय निश्चित केला. या निकालामुळे जपान दोन सामन्यांतून सहा गुणांसह गट ब मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताला आपल्या पहिल्या दोन सामन्यांमधून एकही गुण मिळालेला नाही आणि दिवसाच्या सुरुवातीला लेबनॉनने ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखल्यामुळे ते गटात तळाशी आहेत.

Advertisement

सामन्याच्या सुरुवातीपासूनच जपानने खेळाची लय पकडली आणि माशिरो यामाजी व फुताबा नोडा यांच्या माध्यमातून क्षेत्रात लवकर क्रॉस दिले. भारताने एकसंध बचावात्मक रचनेसह प्रत्युत्तर दिले. कर्णधार अभिस्ता बास्नेट आणि एलिझाबेथ लाक्रा यांनी सुरुवातीच्या टप्यात मध्यरेषा प्रभावीपणे सांभाळली. जपानच्या सततच्या दबावामुळे भारताला आपल्याच अर्ध्या मैदानात रहावे लागले आणि संपूर्ण संघ चेंडूच्या मागेच कार्यरत होता.

बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात चेंडू येत असूनही गोलरक्षक मुन्नीने सतर्कता आणि अचूक वेळेचे भान दाखवत, क्रॉस पकडण्यासाठी आपल्या रेषेवरुन पुढे येत दबाव कमी केला. मध्यंतरापर्यंत जपानकडे चेंडूचा ताबा अधिक होता आणि त्यांनी लक्ष्यावर दोन शॉट्स मारले. तथापि, भारताने आपली रचना एकसंध ठेवली आणि स्पष्ट संधी मर्यादित केल्या. बॅस्नेट, लाक्रा, दिव्यानी लिंडा आणि रितू बडाईक यांचा समावेश असलेल्या बचाव पथकान संपूर्ण अर्ध्यावेण्sत आपली रचना कायम ठेवली. 49 व्या मिनिटाला भारताने बचावफळीत एकसंध रचना कायम ठेवलेली असताना कुरिताने लांबून एक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न हवेत वळला, पण मुन्नीने त्याचा अचूक मागोवा घेतला आणि चेंडू सहजपणे पकडला. जपानने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले.

58 व्या मिनिटाला नोडाने जवळून मारलेला फटका गोलपोस्टच्या बाजुला लागला. एका मिनिटानंतर त्यांनी आघाडी मिळाली. एक तास पूर्ण होण्यापूवीं हायाशीला बॉक्समध्ये जागा मिळाली आणि तनाकाने उजवीकडून तिला पास दिला. हायाशीने चेंडू नियंत्रित करुन खालच्या कोपऱ्यात गोल करत जपानला आघाडी मिळवून दिली. 76 व्या मिनिटाला एका सेट पीसवरुन त्यांनी आपली आघाडी दुप्पट केली. वारा शिमिझूने चेंडू इकेडाच्या दिशेने दिला, जिने जवळून गोल केला. पाच मिनिटांच्या आता तिसरा गोल झाला. शिमिझूने उजवीकडून क्रॉस दिला आणि इकेडाने हेडर मारुन सामन्यातील आपला दुसरा गोल केला. उशिरा गोल होवूनही भारताने बचाव काळ आपली रचना कायम ठेवली आणि सातत्यपूर्ण दबाव कायम ठेवला. विशेषत: अशा संघविरुद्ध ज्याने आपल्या मागील सामन्यात लेबनॉनविरुद्ध 13 गोल केले होते. भारताचा गट ब मधील शेवटचा सामना लेबनॉनविरुद्ध शुक्रवारी होईल.

Advertisement
Tags :

.