कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिडनीतील कार दुर्घटनेत भारतीय महिलेचा मृत्यू

07:00 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका कार दुर्घटनेत भारतीय वंशाच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. सिडनीच्या हॉर्न्सबी उपनगरात एका कारची धडक बसल्याने 33 वर्षीय भारतीय वंशाची गरोदर महिला मृत्युमुखी पडली आहे. समन्वया धारेश्वर ही महिला स्वत:चा पती आणि तीन वर्षीय मुलासोबत चालत जात असताना ही जीवघेणी दुर्घटना घडली आहे. दुर्घटनवेळी समन्वया ही आठ महिन्यांची गरोदर होती. एका कारने परिवाराला फूटपाथ पार करता यावा म्हणून  स्वत:चा वेग कमी केला होता, परंतु त्याचवेळी 19 वर्षीय आरोपी पापाजोग्लूने स्वत:च्या बीएमडब्ल्यू सेडान कारने समोरील कारला जोरदार धडक दिली. यामुळे समोरील कार समन्वया हिला जाऊन धडकली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article