भारतीय शस्त्रास्त्रs करतील आमचे रक्षण
आर्मेनियन विदेशमंत्र्यांना मेड इन इंडियावर विश्वास
वृत्तसंस्था/ येरेवन
आर्मेनियाचे विदेशमंत्री अरारत मिर्जोयन यांनी भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतात निर्मित शस्त्रास्त्रs आमच्या देशाची सुरक्षा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील असे म्हणत मिर्जोयन यांनी भारतात निर्मित संरक्षण उपकरणांच्या खरेदीत रुची दाखविली आहे. भारतासोबत आमचे सहकार्य कुठल्याही तिसऱ्या देशाच्या विरोधात नाही असे मिर्जोयन यांनी म्हटले आहे.
आर्मेनियाच्या संरक्षण क्षेत्रात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणण्याची आमची इच्छा असून यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याचमुळे भारतात निर्मित संरक्षण उपकरणांमध्ये आम्हाला स्वारस्य आहे. भारताकडून शस्त्रास्त्र खरेदी आर्मेनियन संरक्षण प्रणालीच्या सुधारासाठीच होत असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरप्रकरणी भारताचे समर्थन
मिर्जोयन यांनी चाबहार बंदराचा वापर करत भारतासोबतचे आर्थिक सहकार्य वाढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच इराणसोबत चांगले संबंध राखणार आहोत. आमच्या देशाची जागतिक शांततेसाठी प्रतिबद्धता आहे असे म्हणत आर्मेनियाच्या विदेशमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरप्रकरणी भारताच्या भूमिकेचे समर्थन पेल. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत सुधारणांचे समर्थन केले, ज्याची मागणी भारत देखील दीर्घकाळापासून करत आहे.
शतकांपेक्षा जुने संबंध
भारत आणि आर्मेनिया यांच्यात शतकांपेक्षा जुने संबंध असल्याचे म्हणत त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना आर्मेनियात शिक्षणासाठी आमंत्रित केले आहे. येरेवन आणि दिल्लीदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे. अझरबैजानसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आर्मेनियाला अलिकडच्या काळात भारताकडून शस्त्रास्त्रs प्राप्त झाली आहेत. आर्मेनियाला भारताकडून रॉकेट-लाँचर, तोफा, दारूगोळा, स्नायपर रायफल्स, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रs मिळाली आहेत.