For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विश्व नेमबाजी स्पर्धेत भारतीय त्रिकुटाला सांघिक सुवर्णपदक

06:22 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्व नेमबाजी स्पर्धेत भारतीय त्रिकुटाला सांघिक सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था, दोहा : येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत, मंगळवारी रविंदर सिंग, सौरभ चौधरी आणि अमनप्रीत सिंग या भारतीय त्रिकुटाने पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

Advertisement

रविंदरने या स्पर्धेच्या वैयक्तिक प्रकारात रौप्यपदकही जिंकले; विशेष म्हणजे हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नाही. त्याने 559 गुणांसह (11 ‘इनर 10’सह) भारतीय संघात सर्वाधिक गुण मिळवले. अनेक वेळा विश्वचषक सुवर्णपदक विजेता ठरलेल्या सौरभने 551 गुण, तर अमनप्रीतने 549 गुण मिळवले, ज्यामुळे भारताचे एकूण 1659 गुण झाले. चीनच्या झांग बिंगचेन, ल्यु जुनी आणि फेंग लिनलांग यांनी एकूण 1648 गुणांसह रौप्यपदक मिळवले. कांस्यपदक विजेत्या कोरियाच्या हाँग सुह्योन, चो बोराम आणि सो सेउंग सेओब यांच्या संघापेक्षा ते पाच गुणांनी पुढे होते.

वैयक्तिक प्रकारात रशियाच्या अँटोन अरिस्टार्खोव्हने 561 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर रोमानियाच्या लुका जोल्देआने 558 गुणांसह कांस्यपदक पटकावले. दरम्यान, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात राकेश माने, हिमांशू धिल्लन आणि पार्थ माखिजा यांना सांघिक तसेच वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. सध्या एक सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह भारत पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे..

Advertisement

Advertisement
Tags :

.