तुटतेय इंडियन टेक्टॉनिक प्लेट
पूर्ण भारताचा भार वहन करणारी भारतीय टेक्टोनिक प्लेट दोन हिस्स्यांमध्ये विभागली जात असल्याचे समोर आले आहे. याचा खालील दाट हिस्सा वेगळा होऊन पृथ्वीच्या मेंटलमध्ये (अंतर्गत थर) खचत आहे, या प्रक्रियेला ‘डेलामिनेशन’ म्हटले जाते असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. हा शोध हिमालय क्षेत्रात भूकंपाचा पॅटर्न बदलू शकतो, पृथ्वी आता विज्ञानाच्या जुन्या धारणांना आव्हान देत आहे.
हा बदल कसा होतोय?
भारतीय प्लेट आणि यूरेशियन प्लेटची टक्कर सुमारे 6 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली होती. ज्यामुळे हिमालय तयार झाला. भारतीय प्लेट पूर्णपणे यूरेशियन प्लेटच्या खाली सरकत असल्याचे वैज्ञानिकांचे पूर्वी मानणे होते. परंतु आता नव्या संशोधनातून प्लेट पूर्णपणे एकसमान नसल्याचे आणि तिबेटखाली भारतीय प्लेटचा खालील हिस्सा (जो अधिक दाट अन् अवजड आहे) वरील हिस्स्यापासून वेगळा होत आहे, मेंटलमध्ये खचत आहे, वरील हिस्सा पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे.
वैज्ञानिकांनी हा शोध लावण्यासाठी भूकंपीय तरंगांचे (सीस्मिक वेव्स) विश्लेषण पेले आणि तिबेटच्या तप्त पाण्याच्या झऱ्यांमध्ये हीलियम आइसोटोपची तपासणी केली. हीलियम-3 गॅस मेंटलमधू येतो, त्याच्याद्वारे मेंटलमध्ये भेगा पडत असल्याचे कळते. मेंटलचा तप्त खडक वर येत आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे भूभौतिकशास्त्रज्ञ सायमन क्लेम्परर आणि त्यांच्या टीमने हे अध्ययन केले असून ते अमेरिकन जियोफिजिकल युनियनच्या बैठकीत सादर करण्यात आले.
युट्रेख्ट विद्यापीठाचे जियोडायनामिस्ट डूबे वान हिन्सबर्गेन यांनी महाखंड अशाप्रकारे वर्तन करत असल्याचे आम्ही जाणून नव्हतो, हे पृथ्वी विज्ञानाच्या मूलभूत धारणांना बदलणारे असल्याचे म्हटले आहे. ही प्रक्रिया मुख्यत्वे पूर्व हिमालय आणि तिबेटखाली होतेय, येथे कोना-सांग्री रिफ्टसारख्या खोल भेगा या विभाजनशी निगडित असू शकतात.
भूकंपाच्या धोक्यावर काय परिणाम?
हिमालयन क्षेत्र पूर्वीच भूकंपप्रवण आहे. आता हे डेलामिनेशन नवा तणावबिंदू निर्माण करू शकतो. ज्यामुळे भूकंप अधिकवेळा आणि अधिक तीव्र असू शकतात. प्लेट तुटणे आणि खचणे पृथ्वीच्या वरील आवरणात नवे दबाव निर्माण करू शकते. जे मोठे भूकंप घडवून आणू शकतात. तिबेट पठारावर कोना-सांग्री रिफ्टसारख्या ठिकाणी धोका अधिक वाढू शकतो, असा इशारा वैज्ञानिक सायमन क्लेम्परर यांनी दिला आहे.
टेक्टॉनिक्स प्लेटचा खेळ
टेक्टॉनिक प्लेट्स पृथ्वीच्या बाहेरी आवरणाचे (क्रस्ट) तुकडे आहेत, जे मॅग्मावर तरंगतात, भारताची प्लेट दरवर्षी 5 सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकते. तिबेटखाली हे सबडक्शन (खाली खचणे) ऐवजी ‘रिफ्टिंग’ (तुटणे) करत आहे
कसे कळले : भूकंपाचे तरंग प्लेटच्या आतून जाताना बदलून जातात. वैज्ञानिकांनी जीपीएस डाटा आणि उपग्रहीय छायाचित्रांद्वारे तिबेट उंच होत असल्याचे शोधले.
का घडतेय : प्लेटचा दबाव अधिक झाला. वरील हिस्सा हिमालयाला उंच करत आहे (दरवर्षी 5 मिमी) परंतु खालील हिस्सा सरकत नाही.
काय होणार : नव्या प्लेट्स निर्माण होणार, ज्यामुळे हिमालय आणखी उंच किंवा चपटा होऊ शकतो, ही प्रक्रिया मंद आहे, परंतु प्रभाव दीर्घकाळ चालणार
पृथ्वी विज्ञानावर काय प्रभाव पडणार
हा शोध टेक्टॉनिक्स प्लेटच्या जुन्या थेअरीला आव्हान देतो. महाखंडीय प्लेट्स सहजपणे मेंटलमध्ये खचत नसल्याचे पूर्वी मानले जात होते. परंतु आता ते देखील जटिल पद्धतीने वागू शकतात, हे कळले आहे. यामुळे हिमालय आणि तिबेट पठाराची उंची कशी वाढली हे समजून घेण्यास मदत मिळेल. हे सध्या प्रारंभिक निष्कर्ष आहे, अधिक डाटाची गरज आहे. परंतु हे सिद्ध झाले तर जगातील अन्य पर्वतरांगांमध्येही अशी प्रक्रिया घडू शकते. यामुळे भविष्यात भूकंपाचा अनुमान अधिक चांगल्याप्रकारे वर्तविता येणार आहे. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींना नव्या नजरेद्वारे समजून घेता येईल, असे मोनाश विद्यापीठाचे जियोडानामिस्ट फाबियो कॅपिटानियो यांनी म्हटले आहे.
झीवनावर काय प्रभाव पडणार
भूकंपाचा धोका : हिमालय बेल्टमध्ये 80 टक्के जगातील मोठे भूकंप होतात. भारत, नेपाळ, चीनमध्ये लाखो घरं कोसळू शकतात. 2015 मध्ये नेपाळ भूकंपाने 9 हजार मृत्यू झाले.
ज्वालामुखी अन् पूर : मॅग्मा वर आल्याने नवे ज्वालामुखी. ग्लेशियर वितळल्याने गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांना पूर येणार
मानवी जीवन : 10 कोटीहून अधिक लोक हिमालयन क्षेत्रात राहतात. दिल्ली-एनसीआरपर्यंत झटके. अर्थव्यवस्थेला 1 लाख कोटीचे नुकसान
पर्यावरण : हिमालयाची जैवविविधता धोक्यात, हवामान बदल तीव्र होणार