बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघांची रौप्य, कांस्यपदकांवर मोहोर
वृत्तसंस्था, समरकंद : रविवारी येथे झालेल्या 46 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये, भारतीय पुऊष संघाने हंगेरीविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवला आणि ‘टायब्रेकर’च्या आधारे रौप्यपदक मिळवले, तर महिला संघाने जॉर्जियाविऊद्धचा सामना बरोबरीत राखत कांस्यपदक आपल्या नावे केले.
खुल्या गटात उझबेकिस्तानच्या संघाने युक्रेनविऊद्धची अंतिम फेरीची लढत 2.5-1.5 अशा गुणांनी जिंकून पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले. उझबेक संघाने एकूण 22 पैकी 20 गुण मिळवले. त्यांनी 10 फेऱ्या जिंकल्या आणि केवळ जर्मनीविऊद्धचा एक सामना गमावला. भारतीय पुऊष संघाने 18 गुण मिळवले आणि हॉलंडचा पराभव करणाऱ्या जर्मनीसोबत ते संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर राहिले. मात्र ‘टायब्रेकर’मधील सरस कामगिरीमुळे भारतीय संघाला रौप्यपदक मिळाले, तर जर्मनीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या गटात चीनने व्हिएतनामविऊद्ध 3-1 अशा फरकाने शानदार विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. चिनी संघानेही एकूण 20 गुण मिळवले, जे दुसऱ्या स्थानावरील कझाकस्तानपेक्षा दोन गुणांनी अधिक होते. भारतीय महिला संघाला पुन्हा एकदा बी. सविता श्री हिने सावरले. भारतीय महिला खेळाडूंमध्ये तिची कामगिरी सर्वोत्तम ठरली. 10 सामन्यांत नऊ गुण मिळवणाऱ्या सविता श्रीमुळेच भारतीय महिला संघाला कांस्यपदक जिंकणे शक्य झाले.
हंपीने नाना झाग्निद्झेवर जलद विजय मिळवला, परंतु चौथ्या पटावर दिव्या देशमुखचा बेला खोतेनाशविलीकडून पराभव झाला. तिसऱ्या पटावर वर्तिका अग्रवालचा सामनाही बरोबरीत सुटल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीतून आणि राजा सतत धोक्यात असताना सावरण्याची जबाबदारी सविता श्रीवर आली. अखेरीस, सविताने प्रत्येक चालीवर चिवट लढा देत सामना बरोबरीत सोडवला.
सांघिक कांस्यपदकाव्यतिरिक्त सविताने तिच्या कामगिरीसाठी वैयक्तिक सुवर्णपदकही जिंकले. हम्पी आणि वंतिका यांनी कांस्यपदक पटकावले, तर दिव्या देशमुखला तिच्या कामगिरीसाठी रौप्यपदक मिळाले. भारतीय पुऊष खेळाडूंमध्ये प्रज्ञानंदने त्याच्या कामगिरीसाठी कांस्यपदक जिंकले. मात्र शेवटच्या फेरीतील पराभवामुळे गुकेश सुवर्णपदक जिंकण्यापासून थोडक्यात हुकला.