भारतीय संघ ‘पिंक बॉल’वर वर्चस्व गाजविण्यास सज्ज
आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी, दिवस-रात्र सामना, रोहितच्या फलंदाजीच्या स्थानावर राहील लक्ष
वृत्तसंस्था/अॅडलेड
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी व दिवस-रात्र चालणार असलेली कसोटी आज शुक्रवारपासून सुरू होत असून त्यात नेतृत्व करताना रोहित शर्मा आपल्या फलंदाजीचा क्रमांक बदलणार आहे. पराभवाने दुखावलेल्या, परंतु पुनरागमन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध मिळविलेल्या आघाडीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने परिपूर्ण संचरचना वापरण्याकडे संघ व्यवस्थापनाचा कल असेल. परंतु यात सर्वांत मोठी अडचण फलंदाजीच्या क्रमवारीची असून रोहितला सामावून घेण्यासाठी त्यात थोडेसे बदल करावे लागतील. रोहितला बाळाच्या जन्मामुळे पहिल्या कसोटीत सहभागी झाला नव्हता. त्या विश्रांतीनंतर आता तो संघात परतला असून शुभमन गिलही पुन्हा फिट झाला आहे. मात्र भारत क्षमतेपेक्षा कमी ताकदीने खेळण्यापेक्षा ही समस्या झेलण्यास आनंदाने तयार होईल. मागील दौऱ्यात त्यांची स्थिती तशीच होती आणि शेवटी सर्व अपेक्षा मोडीत काढत ते विजयी ठरले होते.
ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वोत्तम खेळ करण्याची भारतीय संघाची प्रवृत्ती हल्ली अनेकदा दिसली आहे. त्यांनी पर्थमधील मालिकेच्या पहिल्या कसोटीत सर्व अपेक्षा चुकविताना वर्चस्व गाजविले आणि ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव नोंदविला. मागील दौऱ्यात भारताने अॅडलेड ओव्हलवर 36 धावांत गारद झाल्यानंतर जोरदार पुनरागमन केले होते. परंतु सुऊवातीच्या कसोटीतील शानदार निकालानंतर पाहुणे यावेळी अधिक चांगल्या स्थितीत आहेत. तथापि, दिवस-रात्र खेळ पाहुण्या संघाच्या फलंदाजांसाठी एक वेगळे आव्हान घेऊन येईल. गुलाबी चेंडूमुळे विशेषत: सायंकाळच्या वेळी अधिक ‘सिम मूव्हमेंट’ होणार असून त्याला तोंड देताना सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. घरच्या मैदानावर 12 दिवस-रात्र कसोटी सामन्यांपैकी फक्त एकच गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये बसलेला तडाखा सलत असेल आणि 10 दिवसांच्या खंडानंतर मैदानात उतरताना मालिकेत पुनरागमन करण्याचे दडपण त्यांच्यावर असेल.
रोहित लय मिळविण्यास उत्सुक
कॅनबेरा येथील एकदिवसीय सराव सामन्याने फॉर्मात असलेला जैस्वाल आणि राहुल डावाची सुऊवात करतील आणि त्यासाठी रोहित स्वत:ला क्रमवारीत खाली उतरवेल याचे संकेत दिलेले आहेत. रोहितने 2019 मध्ये सलामीला येण्यास सुऊवात केल्यानंतर त्याच्या कसोटी कारकिर्दीला नवीन चालना मिळाली होती. फलंदाजीचे स्थान कुठलेही असले, तरी न्यूझीलंडविऊद्धची मायदेशातील मालिका खराब गेल्याने रोहितला कुठल्याही स्थितीत परत फॉर्म मिळवायचा आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही आणि तो कदाचित त्याच्या शेवटच्या ठरू शकणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यात बदल घडविण्यास उत्सुक असेल.
पडिक्कल, जुरेलच्या जागी रोहित, गिल
देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्या जागी रोहित आणि गिल संघात येतील. अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सराव सामन्यात गिल चांगल्या स्थितीत दिसलेला असून जेव्हा तो या कसोटीत फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा ऑस्ट्रेलियातील भूतकाळातील त्याची कामगिरी त्याचा आत्मविश्वास वाढवेल. पर्थमधील फलंदाजीतील सर्वांत मोठ्या सकारात्मक बाबी म्हणजे विराट कोहलीने आपली लय परत मिळवणे आणि ऑस्ट्रेलियातील पदार्पणाच्या कसोटीत जैस्वालने शतकाची नोंद करणे या होत्या. दोन्ही खेळाडू त्यावर कळस चढविण्याचा प्रयत्न येथे करतील. गोलंदाजी विभागात कोणताही बदल अपेक्षित नसला, तरी अॅडलेडच्या खेळपट्टीने नेहमी फिरकीपटूंना मदत केली आहे, ज्यामुळे आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा चर्चेत आले आहेत.
हेझलवूडच्या जागी बोलँड
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासमोर मालिकेत बरोबरी साधण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यांना काळजी करण्याची गरज आहे. पर्थमधील त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे खेळातून बाहेर पडला आहे. अचूक स्कॉट बोलँड त्याच्या जागी संघात खेळेल आणि त्याच्या अथकपणे ऑफस्टंपवर मारा करण्याच्या क्षमतेचा भारतीय फलंदाजांना त्रास होऊ शकतो. मागील जवळपास 18 महिन्यांतील बोलँडची ही पहिली कसोटी आहे. कमिन्सने गुऊवारी पत्रकारांना सांगितले की, एक कर्णधार म्हणून स्कॉटीसारख्या व्यक्तीने संघात येणे खूपच छान वाटते. गरज पडल्यास तो मोठ्या प्रमाणात षटके टाकू शकतो. तो अत्यंत सातत्यपूर्ण आहे, त्याने या स्तरावर कामगिरी करून दाखविलेली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग लाइनअपवरचा दबाव मात्र वाढलेला असून त्यांना जसप्रीत बुमराह आणि त्याच्या साथीदारांना तोंड द्यावे लागेल. खास करून स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्या कामगिरीवर नजर राहणार असून हे दोघेही संघातील आपले स्थान राखण्यासाठी धडपडत आहेत. सलामीवीर नॅथन मॅकस्विनीचे पदार्पण दारुण होते आणि तो देखील त्यात बदल करण्यास उत्सुक असेल. मिचेल मार्श त्याच्या दुखापतीची काळजी घेत असताना तो गोलंदाजी करतो की नाही हे पाहावे लागेल.
राहुल सलामीला कायम, रोहित मधल्या फळीत खेळणार
अॅडलेड : पर्थमध्ये डावाची सुऊवात करताना के. एल राहुलने दाखविलेला संयम आणि चमकदार तंत्रामुळे कर्णधार रोहित शर्मा आजपासून येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात मधल्या फळीतील स्थानावर फलंदाजीस येणार आहे. भारताच्या कर्णधाराने गुऊवारी सांगितले की, ऑप्टस ओव्हलवर 295 धावांनी विजय मिळवून पाहुण्यांनी 1-0 ने आघाडी घेतल्यानंतर संघाला यश मिळवून देणाऱ्या रचनेत बदल करण्याची त्याची इच्छा नाही. राहुलने पहिल्या कसोटीत 26 आणि 77 धावा अशी कामगिरी केली होती आणि पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सहकारी सलामीवीर आणि शतकवीर यशस्वी जैस्वालसह 201 धावा जोडल्य होत्या. राहुल डावाची सुरुवात करेल आणि मी मधल्या फळीतील एखाद्या स्थानावर फलंदाजीस येईन, असे रोहितने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार) जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर.
सामन्याची वेळ : स.9.30 वा.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क