अफगाणिस्तानविरूद्धची लढत रद्द भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल
वृत्तसंस्था, नागोया : खराब हवामानामुळे अफगाणिस्तानविऊद्धची उपांत्यपूर्व फेरीची लढत रद्द झाल्याने भारतीय पुऊष क्रिकेट संघ मैदानात न उतरताच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
गतविजेता असलेला भारतीय संघ आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर असल्याने आणि अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर असल्याने भारताने अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील विजेत्याशी होईल. जर तो सामनाही रद्द झाला, तर श्रीलंकेचा संघ त्यांच्या वरच्या मानांकनामुळे उपांत्य फेरीत भारताशी खेळेल.
नागोयामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे आणि भारत व अफगाणिस्तान यांच्यात कमी षटकांचा सामना होण्याची शक्यताही फारच कमी होती. विशेष म्हणजे जर पावसामुळे संपूर्ण स्पर्धाच रद्द झाली, तर अव्वल मानांकनामुळे भारताला सुवर्णपदक मिळू शकते. पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील पहिली उपांत्यपूर्व फेरीची लढतही पावसामुळे रद्द झाली होती, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ त्यांच्या वरच्या आयसीसी मानांकनाच्या आधारे पुढील फेरीत पोहोचला.