विश्व बॉक्ससिंग चषकासाठी भारतीय संघ घोषित
वृत्तसंस्था/ चेन्नई
ग्रेटर नोएडा येथे 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आगामी पुरुष आणि महिलांच्या जागतिक बॉक्सिंग कप फायनल स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 10 सदस्यीय महिला बॉक्सिंग संघाचे नेतृत्व माजी जागतिक चॅम्पियन निखत जरीन (51 किलो), माजी जागतिक चॅम्पियन जस्मीन लम्बोरिया (57 किलो) आणि मिनाक्षी (48 किलो), दोन वेळची आशियाई चॅम्पियन पूजा राणी (80 किलो), जागतिक चॅम्पियन सवीती बुरा (75 किलो) आणि जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती नुपूर शेओरन (80 किलो) यांना स्थान मिळाले आहे. पुरूषांच्या विभागात तरुणाई आणि अनुभवाचे रोमांचक मिश्रण आहे, ज्याचे नेतृत्व हितेश (70 किलो) आणि अभिनाश जामवाल (65 किलो) करत आहेत. हे दोघेही या हंगामात मागील वर्ल्ड बॉक्सिंग कप टप्प्यातील पदक विजेते आहेत.
या प्रतिष्ठित स्पर्धेत पॅरिसचे तीन ऑलिम्पिक पदक विजेते, दक्षिण कोरियाचे एजी इम आणि चायनीज तैपेईचे वू शिह-यी आणि चेन निएन-चिन यासारखे दिग्गज या स्पर्धेत सहभागी होतील. हंगामातील अव्वल क्रमांकाचे खेळाडू प्रतिष्ठित वर्ल्ड बॉक्सिंग कप ट्रॉफीसाठी दहा वजन श्रेणींमध्ये स्पर्धा करणार आहेत.
जागतिक बॉक्सिंग कप 2025 फायनलसाठी भारतीय पुरुष व महिला संघ - हितेश (70 किलो), अभिनाश जामवाल (65 किलो), जादुमणी सिंग (50 किलो), पवन बार्तवाल (55 किलो), सचिन (60 किलो), सुमित (75 किलो), लक्ष्य चहर (80 किलो), जुगनू (85 किलो), नवीन कुमार (90 किलो), आणि नरेंद्र (90 किलोहून अधिक), निखत जरीन (51 किलो) जस्मिन लंबोरिया (57 किलो), मिनाक्षी (48 किलो), पूजा राणी (80 किलो), सविती बुरा (75 किलो), नुपूर शेओरान (80 किलो), प्रीती (54 किलो), परवीन (60 किलो), नीरज फोगट (65 किलो), अरुंधती चौधरी (70 किलो).