For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा

06:22 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा
Advertisement

बेंगळूर-दिल्ली सलामीची लढत 10 ऑक्टोबरला

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

2026-27 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामाला 10 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बेंगळूर एफसी आणि स्पोर्टींग क्लब दिल्ली यांच्यात सलामीचा सामना बेंगळूरमध्ये तसेच एफसी गोवा आणि चेन्नीयन एफसी यांच्यातील सामना मडगावच्या फातोर्डा स्टेडियममध्ये खेळविला जाईल.

Advertisement

या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील 78 पैकी 53 सामने शुक्रवार, शनिवार आणि रविवार दरम्यान आयोजित केले आहेत. बेंगळूर, चेन्नीयन, चर्चिल ब्रदर्स हे ईस्ट बंगाल, एफसी गोवा, इंटर काशी, केरळा ब्लास्टर, मोहन बागान, मुंबई सिटी एफसी, नॉर्थ ईस्ट युनायटेड, ओडीशा, पंजाब तसेच स्पोर्टींग क्लब दिल्ली असे एकूण 13 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील 78 सामने 10 ऑक्टोबर ते 17 जानेवारी 2027 दरम्यान खेळविले जातील. या टप्प्यातील पहिले 6 संघ दुसऱ्या टप्प्यासाठी (प्लेऑफ) पात्र ठरतील मात्र प्लेऑफ टप्प्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Advertisement
Tags :

.