For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचा दबदबा

06:33 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचा दबदबा
Advertisement

प्रत्येक चार विदेशी विद्यार्थ्यांपैकी एक आहे भारतीय

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीय विद्यार्थ्यांची असल्याचे स्पष्ट आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या प्रत्येक चार विदेशी विद्यार्थ्यांमागे एक भारतीय आहे. विदेशी विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गट असणाऱ्या ‘युएस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट’ने नुकताच या संदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Advertisement

या अहवालात अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसंबंधी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत सध्या 15 लाख 80 हजार विदेशी विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत यावर्षी 5.3 टक्क्यांची भर पडली आहे. 2024 मध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 20 हजार होती. 2023 च्या तुलनेत त्यांच्या संख्येत 11.8 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2024 ते मार्च 2025 या एक वर्षातील आकडेवारी स्वारस्यपूर्ण आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 28 टक्क्यांची घट दिसून आली आहे. तरीही अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारताची आघाडी टिकून आहे.

ट्रम्प प्रशासनाचे धोरण

विदेशी विद्यार्थ्यांच्या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अननुकूल धोरण अवलंबिल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत शिकणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने या धोरणाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना अधिक बसणार हे निश्चित मानले जाते. ही आकडेवारी या गटाने अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदींमधून मिळविलेली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

शिकण्यासाठी व्हिसा

अमेरिकेत शिकण्यासाठी दोन प्रकारचे व्हिसे दिले जातात. एफ 1 हा व्हिसा पदवीशिक्षणासाठी दिला जातो. तर एम 1 हा व्हिसा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी (व्होकेशनल कोर्सेस) दिला जातो. भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी जाणारे 90 टक्के विद्यार्थी एफ 1 व्हिसा मिळवितात, असे दिसून आले आहे. हा व्हिसा उच्च शिक्षणासाठी दिला जात असल्याने अमेरिकेत बव्हंशी भारतीय विद्यार्थी तंत्रवैज्ञानिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असल्याचे या अहवालावरुन दिसून येते.

भारत आणि चीन

अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच इतर आशियायी देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. अमेरिकेतील विदेशी विद्यार्थ्यांपैकी 72 टक्के, अर्थात 11 लाखांहून अधिक विद्यार्थी आशियायी आहेत. भारताने या संदर्भात चीनवर आघाडी घेतलेली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या या वर्षाचा अपवाद वगळता झपाट्याने वाढली आहे. तर चीनी विद्यार्थ्यांच्या संख्येत पाव टक्का घट झाली असल्याचेही या अहवालात स्पष्ट केले गेले आहे.

Advertisement
Tags :

.