लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू
लंडन :
ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील एस. श्रीनाथ रे•ाr एका बर्थडे पार्टीत सामील होण्यासाठी गेला होता, त्याच्या दुसऱ्या दिवशीच संशयास्पद स्थितीत त्याचा मृत्यू झाला होता. 14 महिन्यांपूर्वी श्रीनाथ उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेला होता. आता श्ऱीनाथचे पार्थिव मायदेशी परत आणण्यासाठी त्याचा परिवार सरकारकडे मदत मागत आहे.
श्रीनाथ हे तेलंगणाच्या कामारे•ाr जिल्ह्यातील तालमडला गावाचा रहिवासी होता. श्रीनाथ लीसेस्टरच्या डी मोंटफोर्ट युनिव्हर्सिटीतून मास्टर्सचे शिक्षण घेत होता. श्रीनाथचा मृतदेह मंगळवारी त्याच्या रुममेटला आढळून आला होता. श्रीनाथने गळफास घेत आत्महत्या केल्याचे रुममेटचे सांगणे आहे. तर त्याच्या मृत्यूच्या स्थितीबद्दल स्पष्टता नसल्याचे श्रीनाथचे वडिल मधुसुदन रे•ाr यांनी सांगितले आहे. श्रीनाथचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.