कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय विद्यार्थी अमेरिकेत मृतावस्थेत

06:42 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क 

Advertisement

अमेरिकेत मास्टर्स पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेला हैद्राबाद येथील विद्यार्थी मोहम्मद अब्दुल आरफान तेथे मृतावस्थेत आढळला आहे. तो जवळपास गेला एक महिनाभर बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु होता. तथापि, अखेर ओहायो येथे तो मृतावस्थेत आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून ही माहिती त्याच्या भारतातील कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

Advertisement

2023 मध्ये हा विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. ओहायो प्रांतातील क्लीव्हलँड विद्यापीठात तो शिक्षण घेत होता. मात्र, गेले तीन आठवडे तो बेपत्ता होता. तो जिवंत हवा असेल तर खंडणी द्यावी लागेल, असा संदेश त्याच्या भारतातील आईवडिलांना आला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. 1 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ती न दिल्यास त्याची हत्या करण्यात येईल. त्यापूर्वी त्याची मूत्रपिंडे काढून विकण्यात येतील, अशीही धमकी देण्यात आल्याचे त्याच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. मात्र, केवळ एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने हे प्रकरण संशयास्पद ठरत आहे. 1,200 डॉलर्सची खंडणी मागण्यात आली होती. पण ती कशी आणि कोठे द्यायची याविषयी काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते, असाही दावा त्याच्या आईवडिलांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून काही काळात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article