For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीला अटक

06:44 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीला अटक
Advertisement

इस्रायलविरोधी निदर्शनांचे प्रकरण : विद्यापीठाने घातली अचिंत्यावर बंदी

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत अनेक विद्यापीठांमध्ये इस्रायलच्या विरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या या उलथापालथीदरम्यान भारतीय विद्यार्थी अचिंत्या शिवलिंगनला अटक करण्यात आली आहे. प्रिन्सटन विद्यापीठाने देखील अचिंत्यावर कारवाई करत तिच्यावर प्रवेशबंदी लादली आहे. इस्रायलविरोधी आणि हमासच्या समर्थनार्थ निदर्शनांमध्ये सामील झाल्याने अचिंत्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

भारताच्या कोइम्बतूर येथील अचिंत्याला निदर्शनांमध्ये सामील झाल्याप्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तसेच विद्यापीठ परिसरात येण्यापासून मनाई करण्यात आली आहे. शिस्तभंगाची प्रक्रिया प्रलंबित असेपर्यंत तिच्यावर ही बंदी असणार आहे.

विद्यापीठाच्या मॅककोश कोर्टयार्डमध्ये पॅलेस्टाइन समर्थक शिबिरातून गुरुवारी सकाळी निदर्शने सुरू झाली होती. प्रिन्सटनच्या अधिकाऱ्यांना इशारा जारी केल्यावर निदर्शक पुढे जात होते. विद्यार्थी थांबले नाही तर त्यांना अटकेच्या कारवाईला तोंड द्यावे लागेल असे इशारा कॅम्पस लाइफचे उपाध्यक्ष डब्ल्यू यांनी दिला होता. या निदर्शनांमध्ये 100 हून अधिक विद्यार्थी सामील झाले होते.

अमेरिकेत अनेक ठिकाणी निदर्शने

अमेरिकेत पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मागील काही आठवड्यांमध्ये निदर्शने होऊ लागली आहेत. विशेषकरून मागील आठवड्यात न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आल्यावर आयव्ही लीग स्कूल हार्वर्ड आणि येल समवेत अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठांमध्ये निदर्शनांची तीव्रता वाढली आहे. या निदर्शकांनी गाझामधील हल्ले रोखण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.