महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय शेअर बाजारात बुधवारी तेजी

06:27 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 149 अंकांनी वधारला : बँकांची मजबूत कामगिरी

Advertisement

मुंबई : आठवड्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या विक्रमाला गवसणी घालण्याचे काम केले आहे. सेन्सेक्स 149 अंकांनी तर निफ्टी 58 अंकांनी वाढत बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मजबुत कामगिरीमुळे शेअरबाजार तेजी दाखवू शकला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 149 अंकांनी वाढत 76606 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकानेही समर्थ साथ देत 58 अंकांच्या वाढीसह 23323 अंकांवर बंद होण्यात यश मिळविले. कोल इंडिया यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी बाजारात मजबूत कामगिरी नोंदविली. दिवसभरामध्ये सेन्सेक्स तेजी राखून होता. एकावेळी इंट्राडे दरम्यान सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांपर्यंत वाढून कामकाज करीत होता. सार्वजनिक बँकांसोबत माध्यम क्षेत्राच्या निर्देशांकाने चांगली कामगिरी नोंदवली. या दरम्यान निफ्टी निर्देशांकाने नवी सर्वोच्च पातळी गाठली होती.

Advertisement

ऑटो आणि एफएमसीजी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. या व्यतिरिक्त इतर निर्देशांक मात्र तेजीत होते. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढत कामकाज करीत होते. बुधवारी कोल इंडिया, पॉवरग्रीड कॉर्प, आयशर मोटर, एसबीआय लाईफ, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. दुसरीकडे महिंद्रा, ब्रिटानिया, एचयूएल, टाटा कंझ्युमर, टायटन, इन्फोसिस आणि अदानी पोर्टस् यांचे समभाग मात्र कमकुवत दिसून आले. अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, बजाज ऑटो, सिप्ला, टाटा स्टील आणि हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचले होते. अदानी समुहातील 10 पैकी 5 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. अंबुजा सिमेंटचे समभाग सर्वाधिक 4.5 टक्के वाढत बंद झाले.

जागतिक बाजारात तेजी

आशियाई बाजारामध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि शांघाय कंपोझिट यांचे निर्देशांक तेजीसमवेत कार्यरत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article