शुक्रवारी अखेरच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीत
सेन्सेक्स 455 अंकांनी नुकसानीत, निफ्टी 65 अंकांनी घसरला, बँकांचे समभाग दबावात
वृत्तसंस्था, मुंबई
शुक्रवारी अखेरच्या दिवशी भारतीय शेअरबाजारामध्ये बँकिंग क्षेत्रातल्या समभागांच्या नकारात्मक कामगिरीमुळे घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 455 अंकांनी घसरणीत राहिला होता. आयटी आणि ऑटो समभागांनी बाजाराला तेजी राखत आधार देण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 455 अंकांनी घसरत 78499 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 65 अंकांनी घसरुन 24570 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 317 अंकांनी घसरत 57746 वर बंद झाला. आयटी निर्देशांक 441 अंकांनी वाढत 31547 च्या स्तरावर बंद होताना दिसला. ऑटो निर्देशांकदेखील दमदार तेजीत होता, हा निर्देशांक 534 अंकांच्या वाढीसोबत 29647 वर बंद होण्यात यशस्वी झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभागांमध्ये दबाव पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे निफ्टीतील 50 पैकी 27 समभाग नुकसानीसोबत बंद होताना दिसले. बँकिंग समभागांनी बाजारावर दबाव निर्माण केला होता. ब्रेंट क्रूड कच्चे तेल 82 डॉलर प्रतिबॅरलवर राहिले होते.
विविध समभागांची कामगिरी
रिलायन्स इंडस्ट्री, स्टेट बँक आणि बीईएल यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. यांच्यासोबत एचसीएल टेक, हिंडाल्को, ग्रासीम, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवर ग्रीड कॉर्प, नेस्ले इंडिया, ओएनजीसी, आयशर मोटर्स, टाटा मोटर पीव्ही, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग मजबूत होत बंद होताना दिसले. मिडकॅप निर्देशांकात टाटा टेक, महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्सीयल, अरबिंदो फार्मा, एक्साईड, ज्युबिलंट फूड यांचे समभागदेखील तेजीत होते.
दुसरीकडे बजाज ऑटो, जेएसडब्ल्यू स्टील, ट्रेंट, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले. लार्सन टूब्रो, कोल इंडिया, सनफार्मा, सिप्ला, टाटा स्टील, टायटन, जीओ फायनान्स, टाटा कंझ्युमर, अदानी पोर्ट, मॅक्स हेल्थ केअर यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. जागतिक बाजारामध्ये पाहता आशियाई बाजारात घसरण होती. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.60 टक्के घसरणीत होता. जपानचा निक्केई 0.12 टक्के नुकसानीसह बंद झाला. हाँगकॉंगचा हेंगसेंग मात्र 0.54 टक्के तेजीत होता.