For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसोबत बंद

06:54 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 97 अंकांनी घसरला, एफएमसीजी निर्देशांक घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअरबाजार किरकोळ वाढीसोबत बंद झाल्याचे पाहायला मिळाले. एफएमसीजी, आयटी आणि फार्मा यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 98 अंकांच्या वाढीसोबत 82,988 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांनी वाढत 25,383 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. निफ्टीत एनटीपीसी, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आणि श्रीराम फायनान्स यांनी तेजी राखत बाजाराला आधार दिला. पण बजाज फायनान्स, एचयुएल, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआय लाइफ यांनी घरसरणीसह बाजारावर दबाव घालू पाहिला.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात चांगली तेजी दिसून आली. याच दरम्यान शेअर बाजार सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 83,184 च्या स्तरावर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 25,445 च्या स्तरावरती पोहोचला होता. ऊर्जा, धातू, ऑटो आणि बँकिंग समभागांमध्ये तेजी दिसून आली. महिंद्रा आणि महिंद्रा तसेच एनटीपीसी यांचे समभाग एक टक्क्यांपेक्षा जास्त तेजीत होते. बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर्सचे समभाग जवळपास 2 टक्क्यांनी घसरणीत राहिले होते. दुसरीकडे बजाज हाऊसिंग लिमिटेड, क्रॉस लिमिटेड आणि टॉलीन्स टायर्स लिमिटेड यांचे समभाग शेअरबाजारात सुचीबद्ध झाले. बजाज हाउसिंग फायनान्सचे समभाग बीएसई आणि एनएसईवर 150 रुपयांवर सुचीबद्ध झाले.  समभागाने गुंतवणूकदारांना जवळपास 114 टक्क्यांचा परतावा दिला. तर दुसरीकडे टॉलिन्स टायर्सचे समभाग 227 रुपयांवर तर क्रॉस लिमिटेडचे समभाग 240 रुपयांवर सूचीबद्ध झाले.

हे समभाग वधारले

बीएसईवर एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 2.4 टक्के वाढले. जेएसडब्ल्यू स्टील 1.73 टक्के, एल अँड टी 1.37 टक्के, अॅक्सिस बँक 1.12 टक्के, आयसीआयसीआय बँक 1 टक्का इतके वाढत बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

बजाज फायनान्स 3.33 टक्के, एचयुएल 2.25 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.95 टक्के आणि अदानी पोर्टस् 0.79 टक्के घसरत बंद झाले होते. एफएमसीजी निर्देशांक 0.72 टक्के, आयटी निर्देशांक 0.10 टक्के आणि फार्मा निर्देशांक 0.04 टक्के घसरत बंद झाला.

आशियातील बाजारांमध्ये पाहता जपानमधील निक्केईचा निर्देशांक 0.68 टक्के घसरणीसोबत व्यवहार करत होता. हॉंगकॉंगचा हँगसेंगदेखील घसरणीत होता. कोरियाचा कोस्पी 0.13 टक्के वाढलेला होता तर चीनचा शांघाई कम्पोझीट 0.48 टक्के घसरणीसह व्यवहार करत होता.

Advertisement
Tags :

.