मार्गशीर्ष गुरुवारी भारतीय शेअर बाजारात परतली तेजी
सेन्सेक्स 426 अंकांनी तेजीत, आयटी, ऑटो क्षेत्रे मजबूत
वृत्तसंस्था/मुंबई
अखेर तीन दिवसांच्या सलगच्या घसरणीला भारतीय शेअरबाजारात अखेर गुरुवारी विराम मिळाला आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने पाव टक्का कपातीची घोषणा बाजाराला तेजीत आणण्यात यशस्वी ठरली आहे. याशिवाय भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक संकेत तसेच सकारात्मक जागतिक बाजारांची स्थिती ही कारणेही बाजाराला तेजी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण ठरली. गुरुवारी सरतेशेवटी भारतीय शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 426 अंकांनी वधारत 84818 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकही 140 अंकांच्या तेजीसोबत 25898 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला होता. याचदरम्यान निफ्टी बँक निर्देशांक 249 अंकांनी वाढत 59209 अंकांवर बंद झाला. स्मॉलकॅप100 निर्देशांक 137 अंकांच्या वाढीसह 17228 अंकांवर बंद झाला. सर्वाधिक वाढीत अदानी एंटरप्रायझेस 2.65 टक्के, जियो फायनॅन्शीयल 2.6 टक्के, टाटा स्टील 2.56 टक्के, इटर्नल 2.38 टक्के आणि कोटक महिंद्रा बँक 2.38 टक्के यांचा समावेश होता.
हे समभाग तेजीत
शेअरबाजारात सिप्ला, मारुती सुझुकी, विप्रो, एसबीआय, रिलायन्स, एल अँड टी, बीईएल, टीसीएस, इंडिगो, नेस्ले, ट्रेंट, एचयुएल, बजाज ऑटो, जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, एनटीपीसी यांचे समभाग मजबूत होत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
बाजारात टायटन, आयटीसी, अपोलो हॉस्पिटल, भारती एअरटेल, एशियन पेंटस्, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, एसबीआय लाइफ, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फायनान्स, एमआरपीएल, सुप्रीम इंडस्ट्रिज, कोचीन शिपयार्ड यांचे समभाग घसरणीसह बंद झालेले होते.
क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता फक्तच ऑईल अँड गॅस हा निर्देशांक नकारात्मकतेत बंद झाला. निफ्टी ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, रिअल्टी, फार्मा यांचे निर्देशांक तेजी राखत बंद झाले होते.
तेजीची कारणे
आयटी, ऑटो, मेटल क्षेत्राची मजबूत कामगिरी, भारत-अमेरिका कराराची सकारात्मक बातमी, फेडरल रिझर्व्हची व्याजदरात पाव टक्का कपात तसेच जागतिक बाजारातील मजबुती भारतीय शेअर बाजाराला तेजीकडे नेणारी ठरली.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इटर्नल 291
- टाटा स्टील 166
- कोटक महिंद्रा 2181
- मारुती सुझुकी 16200
- अल्ट्राटेक सिमेंट 11461
- टेक महिंद्रा 1568
- सनफार्मा 1806
- एचडीएफसी बँक 1000
- टीएमपीव्ही 346
- महिंद्रा-महिंद्रा 3654
- इन्फोसिस 1596
- ट्रेन्ट 4045
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1544
- एचसीएल टेक 1672
- लार्सन अॅण्ड टुब्रो 4003
- स्टेट बँक 963
- एनटीपीसी 322
- अदानी पोर्ट 1503
- हिंदुस्थान युनि 2304
- भारत इले. 387
- टीसीएस 3191
- जिओ फायनान्सिअल 298
- टाटा स्टील 166
- सिप्ला 1512
- अंबुजा सिमेंट 535
- ल्यूपिन 2076
- हिरोमोटो 5980
- कोलगेट 2152
- ब्रिटानिया 5862
- आयशर मोटर्स 7255
- मॅरिको 723
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एशियन पेन्ट्स 2779
- भारती एअरटेल 2053
- अॅक्सिस बँक 1272
- बजाज फायनान्स 1005
- आयसीआयसीआय 1359
- पॉवरग्रिड कॉर्प 264
- टायटन 3843
- आयटीसी 403
- एयू स्मॉल फायनान्स 972
- बीपीसीएल 351