For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय शेअरबाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीत

06:59 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय शेअरबाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला : आयटी समभागांची चमकदार कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

बुधवार सलग तिसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला चालूच राहिला होता. पण पडझड फारशी झालेली दिसली नाही. सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला होता. आयटी निर्देशांक बुधवारी तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर 2 टक्के इतका वाढलेला दिसून आला.  बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 102 अंकांनी घसरत 84961 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 37 अंकांनी घसरत 26140 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभागांमध्ये विक्री दिसून आली तर दुसरीकडे निफ्टीत 50 पैकी 29 समभागांमध्ये घसरण दिसून आली. रुपया डॉलरच्या तुलनेत 29 पैसे मजबूत होताना दिसला. मिडकॅप निर्देशांक 276 अंकांनी चढत 61425 अंकांवर बंद झाला तर बँक निफ्टी निर्देशांक 128 अंकांनी घसरत 59991 अंकांवर खाली आला होता.

Advertisement

समभागांची कामगिरी

बुधवारच्या सत्रात पाहता टायटन, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, जियो फायनॅन्शीयल्स, टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, बीईएल, टीसीएस, बजाज ऑटो, कोल इंडिया, आयशर मोटर्स, टाटा कंझ्युमर, टाटा केमिकल्स, पर्सिस्टंट सिस्टम्स, कल्याण ज्वेलर्स यांचे समभाग तेजीत राहिलेले दिसले. तर सिप्ला, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड कॉर्प, मॅक्स हेल्थकेअर, टाटा मोटर्स पीव्ही, एचडीएफसी बँक, नेस्ले, हिंडाल्को, रिलायन्स, एचयुएल, इंडिगो, एसबीआय लाइफ, सिप्ला, टाटा स्टील, डॉ. रे•िज लॅब्ज, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, प्रेस्टीज इस्टेटस्, आयजीएल, एसबीआय कार्ड यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले होते.

क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांमध्ये फक्त आयटी व फार्मा हे दोनच निर्देशांक मजबूतीसोबत बंद झाले. आयटी निर्देशांक 711 अंकांनी वाढला होता तर फार्मा 159अंकांनी वाढला होता. तर दुसऱ्या बाजुला ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, एफएमसीजी, रियल्टी, मेटल व ऑईल अँड गॅस यांचे निर्देशांक निराशादायी कामगिरी करत बंद झाले.

Advertisement
Tags :

.