For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय शेअर बाजार दमदार तेजीसमवेत बंद

06:12 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय शेअर बाजार दमदार तेजीसमवेत बंद
Advertisement

सेन्सेक्स 1073 अंकांनी तेजीत, निफ्टी 312 अंकांनी वधारला, कच्चे तेल 6 टक्के घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

मुंबई: सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी जागतिक सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार दमदार तेजीसोबत बंद झाला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला विराम मिळणार असल्याच्या शांतीवार्तारुपी बातमीने शेअरबाजारात तेजी आली. गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केली. ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी दमदार कामगिरी केली.

Advertisement

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1073 अंकांनी वधारत 76488 अंकांवर बंद झाला तर यासोबत राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 312 अंकांनी वाढत 24031 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 1238 अंकांच्या वाढीसोबत 55293 च्या स्तरावर बंद झालेला पहायला मिळाला. कच्चे तेल 5.7 टक्के घसरणीसोबत 97 डॉलर प्रती बॅरलपर्यंत घसरले होते. रुपयादेखील साधारण 45 पैशांनी मजबूत झालेला दिसून आला. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभागांमध्ये खरेदी पहायला मिळाली तर निफ्टीतील 50 पैकी 40 समभाग मजबुत होत बंद झाले. बँक निफ्टी निर्देशांकात 14 बँकांचे समभाग तेजी राखत बंद झाले.

तेजीतले समभाग अधिक

समभागांची कामगिरी पाहता आयशर मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस व बजाज फायनान्स हे सर्वाधिक तेजीत राहिले. या सोबत टाटा मोटर्स, लार्सन टूब्रो, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रा, विप्रो, बीईएल, अल्ट्रा टेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, मारुती सुझुकी, इंडिगो, आयटीसी, एशियन पेंटस्, एनटीपीसी, टाटा स्टील, ट्रेंट यांचे समभाग तेजीत राहिले. दुसरीकडे मॅक्स हेल्थकेअर, ओएनजीसी, हिंडाल्को यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत पहायला मिळाले. या पाठोपाठ नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, इन्फोसिस, सन फार्मा, ऑईल इंडिया, हिंडाल्को, टाटा कंझ्युमर्स, कोलगेट, सुंदरम फायनान्स व पेज इंडस्ट्रीज यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

क्षेत्रांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता जवळपास सर्वच निर्देशांक सोमवारी तेजीवर स्वार होते. फक्त एफएमसीजी निर्देशांक घसरणीत राहिला होता. निफ्टीतील ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनान्सीयल, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा आणि रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. ऑटो निर्देशांक 445, फायनान्सीयल 570 अंकांनी सर्वाधिक तेजीसह बंद झाला.

Advertisement
Tags :

.