महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय शेअर बाजार अल्पशा वाढीसोबत बंद

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 231 अंकांनी तेजीत : अदानींचे समभाग नफ्यात

Advertisement

मुंबई : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी भारतीय शेअर बाजार अल्पशा तेजीसोबत बंद झालेला पाहायला मिळाला. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री दिसून आली. सेन्सेक्स 230 अंकांच्या तेजीसह बंद झाला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 230 अंकांनी वाढत 80,234 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 80 अंकांनी वाढत 24,274 च्या स्तरावर बंद झाला होता. दिवसभरात शेअरबाजारात चढ उतार पाहायला मिळाला. महत्त्वाचे म्हणजे अदानी समुहातील समभागांनी पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. समुहातील 11 समभागात खरेदी दिसून आली. अदानी समूहाने आपल्या आरोपावरील केलेल्या स्पष्टीकरणानंतर समभाग तेजीकडे वळताना दिसले. यात अदानी पोर्टस्चे समभाग 6 टक्के वाढीसोबत 1200 च्या स्तरावर बंद झाले. तर एनटीपीसीचे समभाग 2.12 टक्के वाढत 369 रुपयांवर, एचडीएफसी बँक 1.50 टक्के वाढत 1812 रुपयांवर बंद झाले आहेत. बजाज फायनान्सचे समभाग 1.32 टक्के, मारुती सुझुकीचे समभाग 1.05 टक्के मजबुतीत होते.

Advertisement

हे समभाग घसरणीत

घड्याळ व दागिन्यांच्या क्षेत्रातील टायटन कंपनीचे समभाग 1.08 टक्के घसरणीसह 3292 रुपयांवर बंद झाले. यासोबत इंडसइंड बँक 0.76 टक्के, सन फार्मा 0.69 टक्के, एसबीआय 0.64 टक्के आणि एशियन पेंटस्चे समभाग 0.53 टक्के इतके बुधवारी शेअरबाजारात घसरलेले दिसले. विविध क्षेत्रांच्या कामगिरीकडे पाहिल्यास आयटी आणि फार्मा क्षेत्राचे निर्देशांक कमकुवत दिसून आले. निफ्टी ऑटो निर्देशांक 0.45 टक्के वाढत 23,517 च्या स्तरावर तर निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.33 टक्के तेजीसह 58,029 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक 0.21 टक्के मजबूत होत 52,302 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक मात्र 0.15 टक्के व फार्मा निर्देशांक 0.61 टक्के इतका घसरणीत राहिला होता.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article