For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय शेअरबाजार घसरणीसोबत बंद

06:10 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय शेअरबाजार  घसरणीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 114 अंकांनी घसरणीत, बँक आणि धातू क्षेत्राच्या समभागांची विक्री

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

इराणवर हल्ला न करण्याची घोषणा अमेरिकेने केल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात चांगली तेजी पहायला मिळाली. मात्र शेवटच्याक्षणी शेअर बाजारात घसरण अनुभवायला मिळाली. बँक आणि धातू कंपन्यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले. याच दरम्यान शेअरबाजारातील गुंतवणुकदारांच्या भांडवलात 2 लाख कोटींची भर पडली.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 114 अंकांनी घसरत 75200 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 31 अंकांनी घसरत 23618 अंकांवर बंद झाला. इंट्रा डे दरम्यान सेन्सेक्स जवळपास 431 अंकांवर वाढत 75746च्या स्तरावर पोहोचला होता. दुसरीकडे निफ्टीसुद्धा इंट्रा डे मध्ये 132 अंकांनी वाढीसोबत 23782 च्या स्तरावर कार्यरत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 12 समभाग तेजीसमवेत बंद झाले.

सर्वाधिक तेजी आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांच्यात दिसून आली. दुसरीकडे कोटक बँक, टायटन आणि अल्ट्रा टेक सिमेंट यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले. इटर्नल, टीसीएस, एसबीआय, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फायनान्स, आयटीसी, एनटीपीसी, ट्रेंट आणि पॉवर ग्रीड कॉर्प यांचे समभाग मजबूत होत तर लार्सन टूब्रो, अॅक्सिस बँक, टाटा स्टिल, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय एअरटेल, सनफार्मा, अदानी पोर्ट, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, एशियन पेंटस, इंडिगो, बीईएल, आयासीआयसीआय बँक यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

विविध निर्देशांकांची कामगिरी पाहता निफ्टी प्रायव्हेट बँक आणि निफ्टी एफएमसीजी यांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातील समभागांची खरेदी झालेली दिसून आली. स्मॉलकॅप-100  एक टक्का आणि मिडकॅप-100 एक टक्क्यांपेक्षा अधिक तेजीत होते. आयटी आणि रियल्टी निर्देशांकांनी बाजाराला तेजी राखत सहारा दिला. आयटी निर्देशांक 3 टक्के आणि रियल्टी निर्देशांक 1 टक्का वाढीसोबत बंद झाला. जागतिक बाजारामध्ये पाहता दक्षिण कोरियाचा कोस्पी 3.25 टक्के घसरणीत होता. तर जपानचा निक्केई 0.44 टक्के नुकसानीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग मात्र 0.48 टक्के तेजीत होता.

Advertisement
Tags :

.