भारतीय शेअर बाजार चौथ्या स्थानावर
नवी दिल्ली :
भारतीय शेअर बाजाराने भांडवल वृद्धीत वाढ करत जागतिक स्तरावर क्रमवारीत हॉंगकॉंगला मागे टाकण्यामध्ये यश मिळवले आहे. या प्रकारे भारत आता जागतिक स्तरावर शेअर बाजारामध्ये चौथ्या स्थानावर आला आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शेअरबाजार मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिला होता. मात्र त्यानंतर शेअर बाजारात सुधारणा होत गेली. रालोआचे सरकार आले तरी गुंतवणूकदारांनी शेअरबाजारावर विश्वास ठेवला. याबाबतीत भारतीय शेअर बाजाराचे भांडवल मूल्य दहा टक्के वाढत 5.2 लाख कोटी डॉलरवर पोहोचले. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 435 लाख कोटींवर पोहोचले होते. या तुलनेमध्ये पाहता हाँगकाँग बाजाराचे मूल्य 5.17 लाख कोटी डॉलरवर होते. भारताने हॉंगकॉंगला या आधी याच वर्षी जानेवारीमध्ये मागे टाकले होते. त्या वेळेला दोन्ही बाजारांमध्ये बाजार मूल्यामध्ये चढ-उतार दिसून आला होता.