जागतिक तेजीत भारतीय शेअरबाजारातही उत्साह
सेन्सेक्स 1187 अंकांनी वधारला : बँकांचे समभाग चमकले : क्षेत्रांचे निर्देशांकांनी राखली तेजी
त . भा. वृत्तसंस्था / मुंबई :
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1187 अंकांनी मजबुत होत 73124 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 348 अंकांच्या मजबुतीसोबत 22679 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 1173 अंकांच्या वाढीसह 51448 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला. निफ्टीतील 50 पैकी 39 समभागांची कामगिरी मजबूत दिसून आली तर सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग मजबुतीसोबत बंद झाले होते. बँकिंग क्षेत्राच्या निर्देशांकातील 14 बँकांचे समभाग तेजीसोबत बंद झाले.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता फक्त फार्मा निर्देशांक नुकसानीसह बंद झाला. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. आयटी निर्देशांक 604 अंकांनी वाढत 29669 अंकांवर तर एफएमसीजी निर्देशांक 597 अंकांनी वाढत 46135 अंकांवर बंद झाला.
हे समभाग तेजीत
शेअरबाजारात बुधवारी एकंदरच तेजीचा माहोल होता. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 1600 अंकांपर्यंत तर निफ्टी 540 अंकांवर तेजी राखून होता. पण शेवटी ही तेजी घटली. बाजारात दिवसभराच्या कामगिरीत ट्रेंट, इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस, बीईएल, एसबीआय, जियो फायनान्स, टाटा मोटर्स पीव्ही, टीसीएस, लार्सन टुब्रो, रिलायन्स, मारुती सुझुकी, हिंडाल्को, इन्फोसिस, टायटन, एशियन पेंटस्, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, कोटक बँक, आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, आयटीसी, एसबीआय लाइफ, श्रीराम फायनान्स, इटर्नल यांचे समभाग तेजीत होते.
हे समभाग घसरणीत
कमकुवत कामगिरीत भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, कोल इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, सनफार्मा, सिप्ला, मॅक्स हेल्थकेअर, डॉ. रे•िज लॅब्ज, अपोलो हॉस्पिटल, अशोक लेलँड, भारती हेक्साकॉम, आयआरबी इन्फ्रा, वोल्टाज, अॅस्ट्रल यांचा समावेश होता.
जागतिक सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार मंगळवारच्या सुट्टीनंतर बुधवारी चांगल्या तेजीसोबत बंद होताना दिसला. सेन्सेक्स 1186 अंकांनी तर निफ्टी 348 अंकांनी वधारत बंद झाला.