For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय स्क्वॅश संघ उपांत्यपूर्व फेरीत

06:47 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय स्क्वॅश संघ उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ होस्टन (अमेरिका)

Advertisement

येथे सुरु असलेल्या विश्व कनिष्ठांच्या सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या मुले आणि मुलींच्या स्क्वॅश संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.

मुलांच्या गटातील झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या भारताने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताच्या के. एस. अरिहंतने कॅनडाच्या हॅरिसचा 15-13, 12-10, 8-11, 11-2 तर दुसऱ्या सामन्यात शौर्या बावाने कॅनडाच्या युसेफ सेरानचा 12-14, 9-11, 11-7, 11-3, 11-1 असा पराभव केला. मुलांच्या विभागात आता भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चौथ्या मानांकित कोरिया बरोबर होईल.

Advertisement

मुलींच्या विभागातील ड गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात हाँगकाँगने भारताचा 2-1 असा पराभव केला. या लढतीत पहिल्या सामन्यात हाँगकाँगच्या तेंगने निरुपमा दुबेचा 11-4, 12-10, 11-2, दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगच्या वाँगने भारताच्या अनाहात सिंगचा 8-11, 11-9, 11-5, 11-7 तर तिसऱ्या सामन्यात हाँगकाँगच्या लियंगने भारताच्या शमीना रियाझचा 11-4, 11-9, 12-10 अशा गेम्समध्ये पराभव केला. या पराभवानंतर ड गटात भारतीय मुलींच्या संघाने दुसरे स्थान मिळविल्याने त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Advertisement
Tags :

.