For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय स्किट नेमबाजांची पात्रतेसाठी संघर्ष

06:39 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय स्किट नेमबाजांची पात्रतेसाठी संघर्ष
Advertisement

वृत्तसंस्था, लोनेटो (इटली)

Advertisement

येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक शॉट गन नेमबाजी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाअखेर पात्रतेच्या चार फेऱ्या संपल्या असून महिलांच्या विभागात भारताची युवा स्किट नेमबाज पेरीनाझ ढालीवालची कामगिरी समाधानकारक झाली असून ती संयुक्त 23 व्या स्थानावर आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता तिला पात्रता विभागातील आणखी एक फेरी खेळावी लागणार आहे.

या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ढालीवालने 22 आणि 24 शॉट्सची नोंद केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिने 24 आणि 23 शॉट्स नोंदविले होते. ढालीवालने 100 पैकी सरासरी 93 शॉट्स नोंदवित संयुक्त 23 वे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या रैझा धिलाँ आणि माहेश्वरी चौहान यांची कामगिरी निराशाजनक झाली.

Advertisement

पुरूषांच्या स्किट नेमबाजी प्रकारातील चौथ्या फेरीत भारताच्या मैराज अहमद खानने 75 पैकी 74 शॉट्स नोंदवित संयुक्त सातवे स्थान मिळविले आहे.  पुरूषांच्या विभागात भारताच्या गिल आणि नारुका यांचे आव्हान मात्र समाप्त झाले आहे.

Advertisement
Tags :

.