महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज संघ जाहीर

06:34 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अखिल भारतीय नेमबाजी फेडरेशनने मंगळवारी रायफल तसेच पिस्तुल नेमबाजांचा संघ जाहीर केला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी 15 सदस्यांचा भारतीय रायफल आणि पिस्तुल नेमबाजी संघ भाग घेईल.

Advertisement

येथे मंगळवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये भारतीय रायफल आणि पिस्तुल नेमबाजी संघ निश्चित करण्यात आला. रायफल नेमबाजीत भारताचे आठ तर पिस्तुल नेमबाजीत भारताचे सात नेमबाज सहभागी होती. ही निवड करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेतील स्पर्धकांच्या कामगिरीचा आढावा लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात विश्व चॅम्पियन रुद्रांक्ष पाटीलने दर्जेदार कामगिरी करत कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेल्या नेमबाजांकरीता सध्या फ्रान्समध्ये सराव सत्र आयोजित केले आहे. भारताचा शॉटगन नेमबाजांचा संघ इटलीतील आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेनंतर घोषित केला जाईल. ही स्पर्धा बुधवारपासून खेळविली जाणार असून ती 18 जूनला संपणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी कोटा पद्धतीनुसार 24 पैकी 21 नेमबाजांनी आपले ऑलिम्पिक स्थान निश्चित केले आहे.

भारतीय रायफल संघ : संदीप सिंग, अर्जुन बेबुटा, इलाव्हेनिल वलरिवन, रमिता, सिफ्ट कौर सामरा, अंजुम मोदगिल, ऐश्वर्या तोमर, स्वप्निल कुसाळे.

भारतीय पिस्तुल नेमबाज संघ : सरबजोत सिंग, अर्जुन चिमा, मनू भाकर, रिदम सांगवान, अनिष बनवाला, विजयवीर सिधू, ईशा सिंग.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article