स्पेलिंग-बी स्पर्धेत भारतीयाची चमक
13 वर्षीय भारतीय-अमेरिकन फैजानने जिंकली स्पर्धा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
13 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी फैजान झाकीने अमेरिकेतील सर्वात कठीण स्पर्धा ‘क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’चा विजेता ठरला आहे. ‘स्पेलिंग बी’ ही शब्दांची अचूक स्पेलिंग सांगण्याशी संबंधित स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकल्यामुळे फैजानला बक्षीस म्हणून 52,500 डॉलर्स (सुमारे 45 लाख रुपये) मिळाले आहेत. गेल्या वर्षी त्याने 25,000 डॉलर्स (21.29 लाख रुपये) जिंकल्यामुळे आता त्याची एकूण बक्षीस रक्कम 77,500 डॉलर्स (66.31 लाख रुपये) झाली आहे. अंतिम टप्प्यात फैजान याने ाम्त्aग्rम्ग्ssासहू (एक्लेअरसिसमेंट) या फ्रेंच शब्दाचा अचूक उच्चार करून हा किताब जिंकला. एक्लेअरसिसमेंट हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ स्पष्ट करणे किंवा काहीतरी समजावून सांगणे असा होतो. गेल्या वर्षी फैजान या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर तो टायब्रेकरमध्ये पराभूत झाला. फैजान हा उपविजेता झाल्यानंतर पुढच्या वर्षी हा किताब जिंकणारा पाचवा स्पर्धक ठरला आहे.