For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय रेल्वे संघ कबड्डी विजेता

06:21 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय रेल्वे संघ कबड्डी विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/बडोदा

Advertisement

येथे झालेल्या 72 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरूषांच्या कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय रेल्वे संघाने पटकाविले. सुनीलकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे संघाने अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या 49-31 अशा 18 गुणांच्या फरकाने पराभव केला.

या स्पर्धेमध्ये विविध राज्यांचे 29 संघ सहभागी झाले होते. हे संघ 8 गटात विभागण्यात आले. गेल्या चार दिवसांमध्ये एकूण 54 सामने खेळविले गेले. रेल्वे पुरूष संघाने या स्पर्धेत बलाढ्या चंदीगड आणि कर्नाटकाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कबड्डी संघालाही त्यांनी पराभूत करत विजेतेपद हस्तगत केले.

Advertisement

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुरूवातीला दोन उपांत्यफेरीचे सामने खेळविले गेले. महाराष्ट्राने उत्तरप्रदेशचा तर भारतीय रेल्वे संघाने चंदीगडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महाराष्ट्र आणि रेल्वे यांच्यातील अंतिम सामन्यात रेल्वे संघातर्फे अशु मलिकने तसेच नरेंद्र कांडोलाने दर्जेदार कामगिरी केली. महाराष्ट्रातर्फे पंकज मोहीतेने चढाईवर 12 गुण नोंदविले. तर अशु मलिकने 8 गुण नोंदविले. रेल्वे संघातील सुनीलकुमार यांचा खेळ दर्जेदार झाला.

Advertisement
Tags :

.